सातारा येथे माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
सातारा : माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा शासकीय विश्रामगृह सातारा येथे ६ फेब्रुवारी २०२२ सोमवार रोजी आयोजित केला होता.या मेळाव्यात लाचलूचपत प्रतिबंधक सातारा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त उज्जवल वैद्य मॅडम यांनी कार्यकर्त्यांना लाचलूचपत प्रतिबंधक अधिनियमांची माहिती दिली. तसेच सामान्य जनतेकडून कायदेशीर सरकारी काम करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या सरकारी कर्मचारी व अधिकारी यांच्या विरोधात तक्रार करण्यायची पद्धती व सापळा कसा लावावा या विषयाची कायदेशीर कार्यप्रणालीची माहिती दिली. कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर (मुंबई)हे होते.
या प्रसंगी जेष्ठ सामाजिक कायकर्ते महारुद्र त्रिकुंडे यांनी कार्यकर्त्याना उत्तमपणे कसे काम करावे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
सातारा जिल्हा अध्यक्ष जावेद आत्तार व जिल्हा संघटक कपील राऊत अन्य सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे सुदंर आयोजन केले होते.
प्रशासन पारदर्शक, लोकाभिमूख व जबाबदार रहावे, सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचारावर आळा बसवा.सरकारी कार्यालयातील जनतेची अडलेली कामे त्वरीत व्हावीत.या उद्देशाने माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन कार्य करीत आहे. परंतु प्रशासन व शासन माहिती अधिकार कायद्या विषयी उदसीन असून हा थेट लोकाांना अधिकार देणारा कायदा प्रभावी राबवावा अशी शासनाची इच्छा शक्ती राहिलेली नाही.
अशा विपरीत परिस्थीतत जास्तीत जास्त लोकापर्यंंत या कायद्याचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणूनजळगांव जिल्हातील कायकर्ते उत्साहाने व जोमाने कार्य करीत आहेत.असेच सकारात्मक कार्य वाढवावे असे उद्गार या प्रसंगी सुभाष बसवेकर यांनी काढले.
या प्रसंगी सातारा जिल्ह्यातील तालूका अध्यक्ष यांच्या नेमणूका जाहीर करण्यात आल्या.
उपस्थित कार्यकर्त्यानी आपापले मनोगत व्यक्त केले अिाण माहिती अधिकार कायदा वापरताना येणाऱ्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी चर्चा केली.
या कार्यक्रमांसाठी सातारा जिहयातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







