लेखक सोपान शिंदे लिखित साहित्याचा रविवारी प्रकाशन सोहळा
मायणी दि.१० :- प्रतिनिधी
चितळी. ता.खटाव येथील ज्येष्ठ कवी व लेखक सोपान शिंदे लिखित आयुष्याच्या वाटेवर, स्वाभिमान, भरारी सावली, युगानु युगे, जगणं आणि वागणं
अनमोल जीवन, दर्शन, आयुष्य, जीवन किंकाळी, झुटींग या बारा पुस्तकांचा प्रकाशन सोहळा व शिंदे यांचा जाहीर नागरी सत्कार कार्यक्रम रविवार दि. १२ फेब्रु. रोजी दु.२ वा.साई मंगल कार्यालय, मोराळे रोड,मायणी याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
लेखक सोपान शिंदे यांचा सत्कार ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत, गोवा येथील प्रा. डॉ. श्रीकृष्ण अडसूळ यांच्या हस्ते होणार असून यावेळी जेष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. बाबुराव गुरव , साहित्यिक इंद्रजित देशमुख,कवी अनिल म्हमाने यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.अशी माहिती सोपानराव शिंदे नागरी सत्कार समिती यांचेकडून देण्यात आली आहे.







