माळेवाडीतील विवाहितेला हुंड्यासाठी मारहाण
आटपाडी प्रतिनिधी
माळेवाडी ता. आटपाडी येथील पूजा बाळू माळी या विवाहित महिलेला कुटुंबातील पती, सासरा, सासू ,दिर ननंद ,चुलत दिर हे सर्वजण छळ व शिवीगाळ करत होते .
तू माहेरून टीव्ही, फ्रिज, व एक लाख रुपये घेऊन ये, तसेच सोडचिट्टी दे ,असे म्हणून पूजा माळी यांना त्रास देत होते. म्हणून पूजा माळी यांनी पती, सासरा, सासू, दीर ,चुलत दीर यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस हे.कॉ. कोरवी करीत आहेत.