फुले एज्युकेशन तर्फे अकलूज मध्ये खिलारे एकतपुरे यांचा सत्यशोधक पद्धतीने साखरपुडा संपन्न
अकलूज /माळवाडी – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन च्या वतीने नुकतेच 2 एप्रिल 2023 रोजी अकलूज माळवाडी या ठिकाणी अक्षय सुनील खिलारे व प्रतीका प्रकाश एकतपुरे यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने सत्यशोधक साखरपुडा प्रकाश नामदेव एकतपुरे , माळवाडी यांच्या निवासस्थानी संपन्न झाला हा साखरपुडा या संस्थेच्या वतीने प्रथमच सत्यशोधक पद्धतीने विधीकर्ते व मुलाचे मामा सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी पार पाडला
या कार्यक्रमाचे सुरुवातीला मुलीची आई वडील प्रतीक्षा व प्रकाश एकतपुरे यांच्या शुभहस्ते थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्वांच्याकडून महात्मा फुले रचित सत्याचा अखंड ढोक यांनी गाऊन घेतला. त्यानंतर वधू-वरांनी सर्व महापूर्शांचे नावाने वंदन करीत आई वडिल ,नातेवाईकांची व देशसेवा करीत समाजहिताचे देखील काम करणार अशी पार्थना दोघानी म्हटली.
तसेच वधू वर यांनी एकमेकांना अंगठी बोटामधे घातली. विधीकर्ते मामा मामी सत्यशोधक रघुनाथ व आशा ढोक यांनी वधूवरांना फुले दाम्पत्य यांची फोटो फ्रेम भेट देऊन एकत्रित शाल पांघरून सन्मानीत केले. त्यानंतर पानसुपारी व महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ महात्मा फुले यांच्या 196 व्या. जयंती व सत्यशोधक समाज स्थापना दीन शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भेट देण्यात आले.या कार्यक्रमासाठी मोलाची मदत सौ.शिला भुजबळ,सौ.लता उबडे प्रणित प्रकाश एकतपुरे,क्षितिज ढोक, मुलाचे चुलते शेखर खिलारे नितीन लिंगे,सुनील पिसे, यांनी मोलाची मदत केली.







