• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, November 10, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी सामान्य जनतेत मिसळून काम करणारे अधिकारी…,. श्री सुंदर गिरी महाराज

माणगंगा by माणगंगा
April 19, 2023
in सातारा जिल्हा
0
प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी सामान्य जनतेत मिसळून काम करणारे अधिकारी…,. श्री सुंदर गिरी महाराज

सामान्य जनतेत मिसळुन काम करणारे प्रांत अधिकारी
शैलेश सूर्यवंशी


-श्री सुंदरगिरी महाराज

म्हसवड,ता.19:कोरोना साथीच्या संकट काळात लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारा,सामान्य जनतेत मिसळुन काम करणारे अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी शैलेश सुर्यवंशी यांचे खटाव-माण मधील जनतेच्या ह्रदयात स्थान कायमस्वरुपी निश्चितपणे राहिल असे प्रतिपादन पुसेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थानचे सुंदरगिरी महाराज यांनी केले.


खटाव -माणचे प्रांतअधिकारी शैलेश सूर्यवंशी यांची बदली झालेनंतर माण-खटाव दोन्ही तालुक्यातील जनतेच्या वतीने दहिवडी येथील सिध्दनाथ मंगल कार्यालयात उत्स्फूर्तपणे आयोजित केलेल्या निरोप समारंभात ते बोलत होते.
श्री.सुर्यवंशी यांची बदली झालेनंतर माण-खटाव दोन्ही तालुक्यातील जनतेने दहिवडी येथील सिध्दनाथ मंगल कार्यालयात उत्स्फूर्तपणे आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते.


यावेळी वांगी येथील दादा महाराज,जिल्हा बँक उपाध्यक्ष अनिल देसाई. खटाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप मांडवे, उद्योगपती धनंजय ओंबासे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप तुपे,दिपक तंडे-बडवे, सिद्धनाथउद्योग समूहाचे अध्यक्ष सुनीलशेठ पोळ, कृष्णा पाणी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. महादेव कापसे,धनाजी पाटील,दहिवडी येथील चैतन्य अकॅडमीचे संचालक संदीप खाडे, “दहिवडी हरित वसुंधरा टीम”चे नंदूकुमार खोत,कारंडे काका,भरतशेठ गांधी,राजेंद्र पिसे,डॉ.अतुल बंदुके,संतोष बोराटे,माण – खटाव मधील सर्व पोलीस पाटील,महसूल कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.


श्री सुंदरगिरी महाराज पुढे म्हणाले की,प्रशासनाच्या सेवेतील अधिका-यांच्या बदल्या होतच असतात. नेमणूक झालेल्या तालुक्यात प्रशासकिय कार्यालयीन कामे करीत असताना तेथील जनतेस सोबतीस घेऊन लोक सहभागातून विकास कामे करणारे अधिकारी मोजकेच असतात.श्री शैलेश सुर्यवंशी यांनी कोरोना साथीच्या संकटाचा प्रशासकिय शिस्तीने केलेला सामना याबरोबरच “हरित वसुंधरा”च्या माध्यमातून केलेली वृक्षलागवडीचे कार्य भविष्यात खटाव -माण मधील जनतेच्या स्मरणात कायमस्वरुपी निश्चितपणे राहिल.
सत्काराला ऊत्तर देताना श्री शैलेश सुर्यवंशी म्हणाले की,
माझ्या सेवा काळात माण – खटावच्या सर्वसामान्य जनतेने दिलेले निरपेक्ष प्रेम माझ्या कायमस्वरुपी लक्षात राहील.


कोरोना साथीच्या कालावधीत अनेकांना ऑक्सिजनची टंचाई समस्या परिणामी कोरोना बाधीत रुग्णांस ऑक्सिजन कमी पडू लागल्यामुळे निसर्गातील वातावरणात ऑक्सिजन वाढीसाठी वृक्ष लागवड काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन “हरित वसुंधरा” संकल्पना सुचली. व तसे विचार मांडले टीम तयार करून सर्वांना एकत्रित घेऊन काम केल्याने यश आले .दहिवडी, शिंगणापूर , गोंदवले ,वडुज येथे हरित वसुंधरा चे काम करण्याची संधी मिळाली हे भाग्य समजतो.


दहिवडी येथील प्रांतधिकारी कार्यालय शासकीय जागेतील सुमारे 12 एकर परिसरात वाढते अतिक्रमण रोखण्यात यश आले.या जागेतच वाढणाऱ्या घाणीचे साम्राज्य रोखून, स्वछतेचे नियोजन करता आले. लोकसहभागातून “हरित वसुंधरा”च्यां माध्यमातून या जागेची स्वच्छता करुन वृक्ष लागवड करुन या वनराई कायमस्वरुपी पाणी देण्याच्या विधायक कार्य। करण्याची मला संधी मिळाली.


या उपक्रमात माण – खटाव दोन्ही तालुक्यातील जनतेने हरित वसुंधरा उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.माझ्या सेवा काळात सकारात्मक विचार सरणीच्या लोकांनी उत्स्फूर्त पणे मला साथ दिली. त्यामुळे हे मला शक्य झाले.दहिवडीसह शिंगणापुर डोंगराळ भागात येथे वृक्ष लाववड करुन त्याचे लोकसहभागातून संगोपण केल्यामुळे आज सारा परिसर वृक्ष हिरवळ होऊन तेथे वनराई आज डोलते आहे.
जनतेने सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय आधीकारी यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे रहायला हवे. लोकांभिमुख कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठबळ दिले पाहिजे अशी अपेक्षाही श्री. सूर्यवंशी यांनी व्यक्ती केली.

या निरोप समारंभापुर्वी श्री शैलेश सुर्यवंशी यांची प्रांत कार्यालय ते सिध्दनाथ मंदीर पासून निरोप समारंभ कार्यक्रम स्थळापर्यंत मिरवणुक काढण्यात आली.
माण खटाव जनतेतून “हरित वसुंधरा टीम” नें उत्स्फूर्त पणे शोभा यात्रा वं निरोप समारंभ कार्यक्रमाचे नेटके यशस्वी नियोजन केले होते.

चौकट

प्रशासकीय अधिकारी म्हणून बदली होणं अन त्यानां निरोप देण हे आलंच. पण शैलेश सूर्यवंशी एक वेगळे व्यक्तिमत्व जे माण खटाव जनतेच्या ह्रदयातच आहेत त्यानां आम्ही निरोप देऊ शकत नाही.
-अनिल देसाई

प्रशासकिय सेवेत असलेल्या अधिकारी यांच्या बदल्या होतच असतात प्रशासकीय पातळीवरील पारदर्शकतेने घेतलेले निर्णयामुळे काही लोकप्रतिनिधीचे समाधान होत नसते हे वास्तव आहे.प्रत्येकाचे समाधान करणे अशक्य असते श्री शैलेश सुर्यवंशी यांनी जनहित पाहून सामान्य जनतेच्या संपर्कात राहून खटाव-माण मध्ये अनेक विकास कामे केलीत म्हणूनच त्यांच्या निरोप समारंभात खटाव-माण तालुक्यातील जनतेची मोठ्या संख्येने उपस्थिती हि त्यांच्या कामाची पोहच पावतीच आहे.

  • श्री.धनंजय ओंबासे

शैलेश सूर्यवंशी म्हणजे प्रशासकीत कामा बरोबरच लोकांना विधायक कामाची दिशा देणारे प्रांतधिकारी ठरले.

  • दिलीपराव तुपे

सर्व सामान्य जताना प्रांतधिकारी म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यान्ची ओळख ठेवतात. पण सर्वसामान्य जनतेत मिसळणारे आगळे व्यक्तिमत्व म्हणून शैलेश सूर्यवंशी यांची ओळख राहील.
-संदीप मांडवे

Views: 314
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
क्रांतीवीर शैक्षणीक संकुल शैक्षणीक क्षेत्रात क्रांती घडवेल: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले

क्रांतीवीर शैक्षणीक संकुल शैक्षणीक क्षेत्रात क्रांती घडवेल: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)