• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

माणचे सुपुत्र वैभव पोरे यांचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने मुख्यमंत्री यांचे हस्ते सन्मान

माणगंगा by माणगंगा
September 6, 2023
in सातारा जिल्हा
0
माणचे सुपुत्र वैभव पोरे यांचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने मुख्यमंत्री यांचे हस्ते सन्मान

म्हसवड,दि.6: राज्यातील चार हजार शाळा व तब्बल दोन लाख ७८ हजार ५०० विद्यार्थ्यांसाठी ४० कोटी रुपयांचे विविध सामाजिक सेवा संस्थांच्या माध्यमातून शालेय व शैक्षणिक साहित्यासह विविध सुविधासाठी मदतकार्य मिळवून देण्यात मुख्य समन्वयकाच्या भुमिकेचे योगदानासह शैक्षणिक सेवा कार्याची शासनाने दखल घेत यंदाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते देऊन येथील वैभव पोरे यांना सन्मानित करुन त्यांचा गौरव करण्यात आला.
मुंबई येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,शिक्षण मंत्री दिपक केसरकर,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचेसह विविध मान्यवर उपस्थित होते.


म्हसवडचे सुपुत्र वैभव पोरे हे पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यातील होळकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आपले ज्ञानदानाचे कार्य करत असून उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे.


विदयार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य विकासनावर भर ,शालेय विद्यार्थ्यांसाठी आकाशवाणी पुणे येथे- बालोद्यान अंतर्गत विद्यार्थ्याचे अनेक कार्यक्रम व राज्यभर प्रसारण,संपूर्ण शाळेत डिजिटल ई लर्निंग माध्यमाद्वारे प्रभावी शिक्षण, इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रमांतर्गत जिल्हास्तरावर श्री पोरे यांनी विशेष कार्य केले आहे.


राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक व एम.एस.सी.ई.आर.टी पुणे येथे विविध साहित्य निर्मिती-लेखनातही त्यांनी सहभाग घेतला आहे.
विद्यार्थ्यांना शालेय ज्ञानार्जन करीत असताना श्री पोरे यामनी ग्रामिण व शहरी भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यींचा भौतिक सुविधांचा विकास करण्यासाठी एनजीओ मार्फत राज्यातील अनेक शाळेला भरघोस मदत प्राप्त करुन देण्याचे योगदान दिले.


श्री पोरे यांनी राज्यातील चार हजार शाळा व दोन लाख ७८ हजार ५०० विद्यार्थ्यांसाठी ४० कोटी रु.चे मदतकार्य मिळवून देण्यात महत्वपुर्ण अशी मुख्य समन्वयकाची भूमिका बजावली आहे.त्यांच्या या योगदानामुळे विविध शाळेतील शालेय सांस्कृतिक क्रिडा-कला स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर यश प्राप्त केले आहे तर विविध उपक्रम व गुणवत्ता सुधार यामुळे शाळेची पटसंख्या कायम वाढू लागली.


दुष्काळी माण तालुक्यातीलही विविध शाळांना भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य,जीवनावश्यक वस्तू,कपडे,अन्नधान्य,सायकल,संगणक,कोरोनाच्या साथीच्या संकटात आरोग्य सेवा,रुग्णवाहिका,वैद्यकीय उपकरणे आदी विविध वस्तू स्वरूपात सर्वतोपरि मदत करण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. विविध संस्था,एनजीओच्या माध्यमातून त्यांनी
माण तालुक्यातही वेळोवेळी मदत आणून मोठे सामाजिक कार्य केले आहे.
त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन श्री पोरे यांना जिल्हास्तरीय,विभागीय स्तरावर कुमुद बन्सल पुरस्कार,नवोपक्रम पुरस्कार, प्रबोधन मित्र पुरस्कार, माणदेश गौरव पुरस्कार यासारखे विविध शेकडो पुरस्काराने त्यांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.


याच कार्याची दखल राज्य शासनाने ही घेऊन त्यांची क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड केली. व मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
वैभव पोरे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच माण तालुक्याच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

चौकट – पुणे जिल्हा ही माझी कर्मभूमी असली तरी माण तालुका ही माझी जन्मभूमी आहे.आपल्या मातृभूमीचे आपण देणे लागतो म्हणून तालुक्यातील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विविध संस्था,एनजीओ, थोर देणीदार यांच्या माध्यमातून मदत आणण्याचे काम करत आहे.शासनाच्या या पुरस्काराने अजून चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले असून हे कार्य आपण अविरतपणे सुरू ठेवणार आहे.

  • वैभव पोरे ,उपक्रमशील शिक्षक छायाचित्र
    मुंबई-माणचे सुपुत्र वैभव पोरे यांना सप्तनिक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समवेत श्री अजित पवार,श्री.दिपक केसरकर श्री.राहूल नार्वेकर आदी.

Views: 188
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
“7 सप्टेंबर ……स्व.डॉ. प्रतापसिंह बेरगळ यांची प्रथम जयंती””सर्वसामान्य जनतेचा आपला हक्काचा माणूस म्हणजे डॉ. प्रतापसिंह बेरगळ “

"7 सप्टेंबर ……स्व.डॉ. प्रतापसिंह बेरगळ यांची प्रथम जयंती""सर्वसामान्य जनतेचा आपला हक्काचा माणूस म्हणजे डॉ. प्रतापसिंह बेरगळ "

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)