शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला वाकी (शिवणे) येथे योगा बाल व युवा संस्कार वर्ग संपन्न.
बाळासाहेब वाळके बाल व युवा संस्कार योगाचे अभ्यासक.
सध्याच्या युगात सगळीकडे आपण आपल्या अवतीभवती घडत असलेल्या घटनांपैकी बहुतांशी घटना ह्या वाईट घडत असतात, हे वास्तव आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया व सोशल मीडियातून नेहमी पाहत असतो. या युगात ज्ञानेश्वर माऊली ,स्वामी विवेकानंद , महात्मा फुले ,छत्रपती शिवाजी महाराज, माता माताअहिल्यादेवी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,अण्णाभाऊ साठे. डॉ.अब्दुल कलाम या महापुरुषांसारखे प्रभाव व्यक्तिमत्व घडावे ,तसेच विविध क्षेत्रातून टॉपला मुले जावीत. सुसंस्कारित निरोगी पिढी तयार व्हावी .
शिवाय सर्व मुलांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्तर वाढावा. तसेच शालेय जीवनाबरोबरच, व्यावहारिक करिअर व जीवन सुखी समृद्धी व्हावे .या उच्च उदात्त हेतूने बाल व युवा संस्कारचे अभ्यासक, बाळासाहेब वाळके यांनी प्रशालेतील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास, व्यायाम, योगा व बौद्धिक खेळांचे महत्त्व तसेच मोबाईलचे व व्यसनांचे दुष्परिणाम सांगून मंत्रमुग्ध केले.