माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करणारांची चौकशी व्हावी.. हनुमंतराव देशमुख यांची जिल्हा पोलीस प्रमुखाकडे मागणी
आटपाडी प्रतिनिधी
दिघंची ता.-आटपाडी येथील शिंदे सेना गटाच्या गावगुंड व्यक्तींनी भारत चव्हाण (पाटील) या व्यक्तीला हाताशी धरून त्याच्याकडून पैसे घेऊन दिघंची विकास सोसायटीच्या जागेवर भरत चव्हाण यांचे नाव ग्रामपंचायत उताऱ्यावर बोगस चढवून पैसे हडप करण्याचा डाव हाणून पाडला असल्याने आटपाडी येथील म्होरक्याने विट्यातील युवानेते यांच्या मदतीने माझ्यावर खोटा गुन्हा पोलिसांत जाणीवपूर्वक गुन्हा नोंदवण्यास भाग पाडले आहे व माझी आटपाडी खानापुर तालुक्यात बदनामी केली आहे.याची चौकशी व्हावी याबाबत राष्ट्रवादीचे हनुमंतराव देशमुख यांनी जिल्हा पोलीस प्रमुखाकडे अर्ज केला आहे.
पुढे म्हंटले आहे की हणमंतराव धोंडीसाहेब देशमुख आत्तापर्यंत चेअरमन-दिघंची विकास सोसायटी, चेअरमन बिजोत्पादक सहकारी संघ सांगली, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी, माजी अध्यक्ष आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, माजी सरपंच दिघंची येथे काम पाहिले आहे. तसेच मी दिघंची विकास सोसायटीचा चेअरमन आहे. २० वर्ष सरपंच व उपसरपंच म्हणून काम केले आहे. माझ्या देशमुख कुटुंबाने गेली ५० वर्ष राजकारण व समाजकार्य केले आहे व करीत आहे माझी पत्नी आटपाडी तालुका पंचायत समिती सभापती होत्या. माझे वडील धोंडीसाहेब देशमुख हे दिघंची गावचे ४० वर्ष सरपंच होते तसेच दिघंची विकास सोसायटीचे चेअरमन होते
त्यांनी अनेक जिल्हास्तरीय संस्थांवर काम केले आहे. मीही अनेक जिल्हास्तरीय तसेच तालुका स्तरीय संस्थावर प्रामाणिकपणे काम करीत आहे. प्रामाणिकपणे काम करणे हे गेली ४० ते ५० वर्षे समाजकार्य करणेची आमची परंपरा आहे, असे असताना माझ्या वर खोटा गुन्हा दाखल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न नेते करीत आहेत .
मी चेअरमन असलेल्या दिघंची विकास संस्थेच्या नावावर ७/१२ उतारा आहे संस्थेने सदरची जागा बिनशेती (NA) केलेली आहे. भूमी अभिलेख कार्यालयात सदर जागेचे सिटी सर्व्हेला नोंद आहे. असे असताना दिघंची येथील अमोल मोरे यांनी भारत चव्हाण (पाटील) या व्यक्तीला हाताशी धरून त्याचेकडून पैसे घेऊन तुला मोक्याची जागा मिळवून देतो असे सांगून दिघंची विकास संस्थेच्या जागेत घुसखोरी करायला लावली आहे.
सदरचा प्रकार माझे लक्षात आल्यानंतर मी हा प्रकार हाणून पाडला तेव्हा अमोल मोरे यांनी पत्नी सरपंच असलेचा फायदा घेऊन ग्रामपंचायत दप्तरी ८ अ उताऱ्यावर बेकायदेशीरपणे भारत चव्हाण याचे नाव लावले आहे.
या बोगस नोंदीला मी विरोध केल्यानंतर अतिक्रमण कायद्यान्वये सरपंच पदावर कारवाई होईल या भीतीने अमोल मोरे यांच्या पत्नीस वाचवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी आटपाडी पोलिसांवर दबाव आणून माझ्यावर खोटा गुन्हा नोंद करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.
मौजे दिघंची येथील गायरान जमिनी परस्पर विक्री करणे गावठाण जमिनी, ग्रामपंचायत रेकॉर्ड मध्ये खाडाखोड करणे असे अनेक प्रकार त्यांनी केलेले आहेत. या पूर्वीही त्यांची चौकशी होऊन हे गैरप्रकार जि. प. सांगली चे तत्कालीन सीईओ यांनी वरीष्ठ कार्यालयला रिपोर्ट पाठवला आहे. असे अनेक प्रकार या टोळीने केलेले आहेत.
वरील सर्व प्रकारची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी हणमंतराव धोंडीसाहेब देशमुख यांनी केला आहे याबाबत जिल्हाधिकारीसो, सांगली ,पोलीस निरीक्षकसो, आटपाडी. यांना निवेदन दिले आहे.