*पानी फाऊंडेशन प्रस्तुत फार्मर कप 2023स्पर्धेत आटपाडी तालुक्यातील महिलांची बाजी*
आटपाडीच्या शेरेवाडी आणि खरसुंडी येथील महिला शेतकरी गटांनी ऐतिहासिक विजय मिळवला.महाराष्ट्रातुन तब्बल3000 महिला व पुरुष शेतकरी गट या स्पर्धेत सहभागी झाले होते यामध्ये महाराष्ट्र राज्यात शेरेवाडीच्या “प्रगती महिला शेतकरी गटाने” तिसऱ्या क्रमांकाचे रोख रक्कम अडीच लाख आणि स्मृतिचिन्ह असे बक्षीस मिळवुन ऐतिहासिक विजय प्राप्त केला.
तसेच खरसुंडीच्या “हरित क्रांती महिला शेतकरी गटाने” आटपाडी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत रोख रक्कम एक लाख रुपये आणि मानचिन्ह मिळवले,आणि आटपाडीचा झेंडा काल अवघ्या महाराष्ट्रात फडकवला , शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेती करावी आणि आपले उत्पन्न वाढवून कमी खर्चात शास्त्रज्ञ मार्गदर्शनातून विषमुक्त शेतमाल उत्पादित करून प्रतवारी ,पॅकिंग,प्रक्रिया करून शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी पानी फाऊंडेशन गेल्या 3वर्षांपासून अविरत काम करत आहे कोणतंही काम करत असताना महिलांना सहभागी करुन जर काम केले तर ते काम100%पुर्ण होते याचा प्रत्यय आज पुन्हा आला
एमएसआरएलएम म्हणजे उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे यासाठी पानी फाऊंडेशन आणि उमेद यांनी एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय घेतला महिलांनी ट्रेनिंग घेतले तालुका अभियान कक्ष व्यवस्थापक क्लस्टर कॉरडीनेटर पंचायत समिती गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर साहेब सचिन भोसले साहेबांचे नेहमी सहकार्य लाभत आहे तसेच तालुका कृषी अधिकारी मारुती कौलगे,कृषी विभाग कृषी सहायक आत्मा यंत्रनेसह या सामाजिक चळवळीस वाढवण्यास हातभार लावण्याचे महत्वपूर्ण काम निस्वार्थीपणे तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक,प्रिंट मीडिया,पत्रकार बंधू आटपाडी एज्युकेशन,शेती परिवार इतर अनेक संस्थांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांचे योगदान मिळत आहे
सिनेअभिनेते अमीर खान किरण राव यांचे हस्ते पुरस्कार वितरण झाले सीईओ सत्याजित भटकळ,प्रमुख मार्गदर्शक डॉ अविनाश पोळ,रीना दत्ता,सह्याद्रीचे विलास शिंदे,इतर मान्यवर उपस्थित होते या ही वर्षी आटपाडी तालुक्यातील महिला पुरुष शेतकऱ्यांना बक्षिसे जिंकता येणार याची सुवर्ण संधी याच महिन्यापासून सुरू होतेय चला लागुया तयारीला ११मार्च पासून४बॅचमध्ये सर्व प्रगतिशील व शेतकरी युवा यांना अडीच दिवसीय संजीवनी कृषी पर्यटन केंद्र येथे प्रवास भोजन यांसह निवासी मोफत प्रशिक्षण घेता येणार आहे आपला सहभाग निश्चित करा तालुका समन्वयक सुहास पाटील व राजेंद्र पाटील यांना संपर्क करा आणि इथून पुढील आपल्या शेतीतील बदलाच्या उत्पादन वाढीच्यासुवर्ण क्षणांचे साक्षीदार व्हा तसेच फळबाग,पशुपालन याचेही ज्ञान लवकरच मिळणार आहे