जेष्ठ नेते आनंदराव पाटील, सादिक खाटीक यांची उपस्थिती
लोकशाही, स्वातंत्र्य, संविधानाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने डोळस बनावे .
सुशांत देवकर, आनंदराव पाटील, सादिक खाटीक .
आटपाडी प्रतिनिधी
भारतीय लोकशाही, स्वातंत्र्य, संविधान आबाधीत रहावे यासाठी प्रत्येक भारतीयाने यापुढच्या काळात डोळसपणे भूमिका बजावली पाहीजे असे मत सुशांत देवकर, आनंदरावबापू पाटील आणि सादिक खाटीक यांनी व्यक्त केले .
जलसंपदाच्या स्थापत्य विभागात सहाय्यक अभियंता म्हणून निवड झालेले मिटकीचे श्री . निवास जगन्नाथ कोळपे यांचा तसेच प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षक म्हणून गोंदिया जिल्ह्यात निवड झालेल्या मिटकीच्याच सौ . मोनिका आकाराम कोळपे यांचा सत्कार मिटकी ग्रामस्थांच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खानापूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर आणि राष्ट्रवादी पक्षाचे आटपाडी तालुका अध्यक्ष आनंदरावबापू पाटील यांच्या हस्ते फेटा शाल श्रीफळ हार घालून सत्कार करणेत आला . त्यावेळी हे मान्यवर बोलत होते .
सत्कारमूर्तीना शुभेच्छा देवून सुशांत देवकर यांनी, आटपाडी तालुक्यात पाण्याचा कायम दुष्काळ असतानाही या भागाने नेहमीच विचाराच्या श्रीमंतीचे दर्शन घडविले आहे . थोरा मोठ्यांची जननी असलेल्या या भागातल्या लोकांनी प्रचंड कष्ट, यातना सहन करीत वाटचाल केली आहे . बहुजन, अल्पसंख्याक, शेतकरी, कष्टकरी, महिला वगैरे सर्वच समाज घटकांसाठी राष्ट्रीय नेते शरदचदजी पवार साहेबांनी केलेले प्रचंड कार्य देशात स्पृहनीय आहे, असे आपल्या भाषणात स्पष्ट केले .
क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी , डॉ . भारत पाटणकर यांच्या प्रदिर्घ लढ्यातूनच या भागात कृष्णाईचे पाणी आल्याचे स्पष्ट करून आनंदरावबापू पाटील यांनी, कुटुंबांच्या, भागाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने सर्व क्षेत्रातल्या शिक्षणाला आत्मसात करीत भागाचा नावलौकीक वाढवावा असे आवाहन केले .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी आपल्या भाषणात , या कायम दुष्काळी आटपाडी तालुक्यातल्या अनेक पिढ्या पाणी पाणी चा टाहो फोडत बरबाद झाल्या. अनंत यातना, अपरिमित कष्ट करणारांनी, मिळेल त्या व्यवसाय, उद्योगातून अगदी हमाली पासून भटकंती, स्थलांतरातून जगण्यासाठी देशाला जवळ करण्याचा प्रयत्न केला . पन्नास वर्षापूर्वी या भागात कृष्णेचे पाणी आले असते तर, सर्वच क्षेत्रात देशाला गवसणी घालणारी गुणवत्ता आटपाडी तालुक्यातील प्रत्येक वाडी, वस्ती, खेडे, गाव, शहरातून पुढे आली असती . एवढे प्रचंड ज्ञान, बौध्दिकता, विचारांची समृद्धी येथे आहे . आटपाडी तालुक्यातील अतिशय कष्टाळू, प्रामाणिक, जिगरबाज हजारो उच्चशिक्षित मुले पुण्या – मुंबई सारख्या प्रचंड खर्चिक शहरांच्या ठिकाणी नाईलाजाने तुटपुंज्या पगारात काम करतात, हे दुर्देवी आहे . आटपाडी तालुक्यातच बेंगलोर कॉरीडोर सारख्या अद्ययावत औद्योगिक वसाहती, विविध उद्योग, वेगवेगळ्या प्रकारची कारखानदारी, कुशलता वाढीस लावणाऱ्या निरनिराळ्या व्यवस्थांचे जाळे निर्माण झाल्यास शहराकडे गेलेली ही उच्चपदस्थ तरुणाई आटपाडी तालुक्यातच स्वतःच्या आर्थीक प्रगतीबरोबर, भागाच्या प्रचंड विकासात मोठे योगदान देईल.
यासाठी भागातल्या नेतृत्वाने मोठी पावले टाकली पाहिजे, असे आवाहन केले .
प्रारंभी स्वागत प्रास्तावीक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष जालींदर कटरे यांनी केले .
यावेळी माजी उपसभापती हणमंतराव पडळकर, सांगोलेचे माजी उपसरपंच विजय बाबर, संजयशेठ निकम, ग्रा . पं . सदस्य प्रवीण बाबर, अनिल बाबर, बनपूरीचे दत्ता यमगर, शरद सोन्नूर धुळाजी ठेंगले, मिटकीचे माजी सरपंच दादा कोळेकर, माजी सरपंच यशवंत कोळपे, माजी सरपंच दुर्योधन कोळपे, चंद्रकांत कोळपे, ग्रा.पं. सदस्य आबा यमगर माजी उपसरपंच संतोष जरग, नवनाथ कटरे, मोहन कटरे, अण्णा कोळेकर, रंगनाथ कोळपे, प्रभती कोळेकर, पोपट कोकरे, संजय कोकरे, ऋतिक पडळकर, बाळूमामा देवस्थानचे पुजारी संजय यमगर, गणेश घुटुकडे, महालिंग पडळकर, बाळासाहेब पडळकर इत्यादी अनेक जण उपस्थित होते. शेवटी आभार चंद्रकांत कोळपे यांनी मानले .