विभूतवाडी गावचा लोकसभा निवडणुकीवरील बहिष्कार अखेर मागे,ग्रामस्थांतून तीव्र नाराजी
तहसीलदार सागर ढवळे यांची मध्यस्थी
आटपाडी प्रतिनिधी
विभूतवाडी व गुळेवाडी ता. आटपाडी या गावाला टेंभूचे पाणी मिळावे यासाठी शिवजयंती चे अवचित्य साधून ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांची मीटिंग घेऊन जोपर्यंत आमच्या गावाला पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही पद्धतीचे मतदान करणार नाही तर येणाऱ्या सर्वच निवडणुकीवरती आम्ही बहिष्कार टाकणार असल्याचा ठराव सभेमध्ये झाला. तसेच ठरावाच्या प्रती संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या होत्या.
त्यानंतर तहसीलदार सागर ढवळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ग्रामस्थ व अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणली होती.
यामध्ये उपविभागीय अधिकारी, डॉ.विक्रम बांदल तहसिलदार सागर ढवळे यांचे अध्यक्षतेखाली विभूतवाडी, गुळेवाडी, येथील ग्रामस्थांची लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकत असलेचे संदर्भात त्यांचे अडीअडचणी जाणून घेणेबाबत, दिनांक 29/02/2024 रोजी तहसिल कार्यालय आटपाडी येथे बैठक आयोजित करणेत आली होती.
सदर बैठकीस खालील विभागाचे कार्यालयीन अधिकारी कर्मचारी व विभूतवाडी, येथील ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीमध्ये गावातील सरपंच व अन्य दोन नागरिक उपस्थित होते यामध्ये या तिघांनीच गावचा कोणताही न विचार करता बहिष्कार मागे घेतल्याने गावातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तसेच प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तह.सागर ढवळे,पोलीस निरीक्षक पी.डी. गायकवाड,गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर,उपमुख्याधिकारी नगरपंचायत आटपाडी, शशिकांत शिंदे, व्ही आर अर्जेटरावउपस्थित होते.
विभुतवाडी, गुळेवाडी येथे टेंभू योजनेचे काम मंजूर आहे. परंतू सदर कामाचे टेंडर झालेले नाही त्यामुळे गावातील पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे. त्यामुळे गावातील लोकांचा आक्रोश वाढ आहे. तरी सदर कामाचे टैंडर होवून वर्क ऑर्डर देण्यात यावी अन्यथा लोकसभा मतदानावर गावातील सर्व मतदार बहिष्कार टाकणार असलेबाबत ग्रामपंचायत विभूतवाडी यांनी निवेदन दिले होते
तसेच सरपंच विभूतवाडी यांनी निविदा जाहिर झालेने आमचे मतदानाविषयी असलेला आक्षेप मिटलेला आहे. त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणूक मतदानावरील बहिष्कार मागे घेत असलेबाबत सांगितले आहे.
चौकट.. विभूतवाडी व परिसरातील वाड्यावस्ता वर्षानुवर्षे दुष्काळाच्या छायेत असून उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासते .पिण्याच्या पाण्यासाठी व गुराढोरांच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते अशा प्रसंगातून येथील मेंढपाळ व शेतकरी कसेबसे जगत आहेत. तालुक्यामध्ये बऱ्यापैकी टेंभूचे पाणी आलेले आहे .
परंतु विभूतवाडी गावाला टेंभूचे पाणी आले नाही म्हणून गावाने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले होते परंतु गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी नागरिकांची दिशाभूल करून दोन ते तीन व्यक्तींनी बहिष्कार मागे घेतल्याचे पत्र तहसीलदार कार्यालयामध्ये दिले आहे.