वन विभागाच्या कर्माचाऱ्यास मारहाण..पोलिसात गुन्हा नोंद..
प्रतिनिधी जत
बेळंकी ता. जत येथील वनरक्षक गणेश विठोबा दुधाळ यांना विशाल पाटील, सागर पाटील व अनोळखी दोन इसम यांनी मारहाण केली याबाबत पोलिसांमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत चंद्रकांत श्रीरंग ढवळे यय 55 वर्षे व्यवसाय नोकरी (वन परीमंडळ अधिकारी जत यांनी वर्दी जबाब दिला आहे.
वर्दीजबाबात म्हंटले आहे की मी सध्या जत फॉरेस्ट ऑफिस येथे एक वर्षांपासून वन परीमंडळ अधिकारी म्हणून नेमणूकीस आहे. सध्या जल युक्त शिवार योजनेअंतर्गत वन विभागाचे मौजे बेळूखी येथे फॉरेस्ट कं.नंबर 235 मध्ये सलग समतल चर खोदाई चे काम चालू आहे. सदर कामाचे टेंन्डर विकास राठोड रा. जत यांना दिले आहे. सदरचे काम करून घेणेची जबाबदारी हद्दीचे वन रक्षक गणेश विठोबा दुधाळ यांचेवरती सोपविण्यात आले आहे.
परंतु दिनांक 30/03/2024 रोजी सकाळी 8 च्यासुमारास बेळुंखी येथील फॉरेस्ट कं.नंबर 235 मध्ये सलग समतल चर खोदाई चे काम जे.सी.बी यंत्राद्वारे चालू होते. त्यानंतर सकाळी 11.00 वा चे सुमारास मी डफळापूर येथे असताना मला वन रक्षक गणेश विठोबा दुधाळ यांचा फोन आला तेव्हा त्यांनी मला सांगीतले की, बेळूखी गावातील विशाल पाटील, सागर पाटील व अनोळखी दोन इसम यांनी काम चालू असले ठिकाणी येवून जेसी.बी चालक सचिन तोरवे याला दमदाटी करून काम थांबविले आहे असा मला फोन आला होता. मी त्या ठिकाणी जात आहे. असे सांगीतल्याने मी लागलीच डफळापूर क्षेत्रातील वन रक्षक भैरवनाथ यादव यांना घेवून सदर ठिकाणी गेलो त्यावेळी तेथे जावून पाहीले असता काम बंद होते.
त्यानंतर आम्ही त्यांना काम का बंद केले आहे. असे विचारले असता, त्यावेळी विशाल पाटील याने तुम्ही काम कोणाला विचारून चालू केले आहे. असे म्हणाला त्यावेळी आम्ही त्यांना सदरच्या काम सरकारी वन क्षेत्रात चालू आहे. ते आमच्या वरीष्ठांच्या परवानगीने चालू आहे व तुम्हाला आदेश ची काय माहीती पाहीजे असेल तर तुम्ही जत येथील ऑफिस मधून घेवून जावा असे वन रक्षक दुधाळ हे सांगत असताना विशाल पाटील यांनी त्यांना शिवीगाळी करण्यास सुरूवात केली व जीवे मराण्याची धमकी दिली. त्यावेळी वन रक्षक गणेश दुधाळ हे त्यांना शिवीगाळी करू नका असे समजावून सांगत असताना विशाल पाटील व सागर पाटील व अनोळखी दोन इसम यांनी गणेश दुधाळ यांना लाथाबुक्यांनी मारण्यास सुरुवात केली.
त्यावेळी मी व वन रक्षक भैरवनाथ यादव, जे.सी.बी चालक सचिन तोरवे, यांनी त्यांची भांडणे सोडविली त्यावेळी आम्ही वन परीक्षेत्र अधिकारी प्रविण पाटील यांना फोन केल्यानंतर ते ही घटनास्थळी हजर झाले व त्यानंतर आम्ही जत पोलीस ठाणे येथे फोन केल्यानंतर जत पोलीस ठाणेकडील पोलीस स्टाफ आले.होते.
दि 30/03/2024 सकाळी 11.00 वा चे सुमारास बेळुंखी येथील फॉरेस्ट कं. नंबर 235 मध्ये सलग समतल चर खोदाई चे काम जे.सी.बी यंत्राद्वारे चालू असताना वेळूखी गावातील विशाल पाटील, सागर पाटील व अनोळखी दोन इसम यांनी काम चालू असले ठिकाणी येवून जे.सी.बी चालक सचिन तोरवे याला दमदाटी करून काम थांबविले असता त्या ठिकाणी मी व माझे सोबत असले वन रक्षक गणेश दुधाळ यांनी त्यांना सदरचे काम सरकारी वन क्षेत्रात चालू आहे.
ते आमच्या वरीष्ठांच्या परवानगीने चालू आहे व तुम्हाला आदेश ची काय माहीती पाहीजे असेल तर तुम्ही जत येथील ऑफिस मधून घेवून जावा असे वन रक्षक दुधाळ हे सांगत असताना विशाल पाटील यांनी त्यांना शिवीगाळी करत असताना गणेश दुधआळ हे त्यांना शिवीगाळी करू नका असे समजावून सांगत असताना विशाल पाटील, सागर पाटील व अनोळखी दोन इसम यांनी गणेश दुधाळ यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून आम्ही करत असलेल्या शासकीय कामात अडथळा आणला आहे म्हणून विशाल पाटील, सागर पाटील, दोन अनोळखी इसम सर्व रा. बेळूखी ता. जत जी. सांगली यांचे विरूध्द तक्रार दिली आहे.