◼️स्व आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालयात शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत- “क्रीडा दिवस” साजरा:
शिरपूर: महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राष्ट्रीय शिक्षण धोरण च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत त-हाडी येथील स्व आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात” शिक्षण सप्ताह” साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात येत आहे:
आजचा दिवस “क्रीडा दिवस” म्हणून साजरा करण्यात आला या उपक्रमांतर्गत इ.५ व १२ वी मुला मुलींसाठी कबड्डी, लंगडी, धावणे, खो खो.गोळाफेक थाळी फेक असे. विविध खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या याप्रसंगी क्रीडा विभाग भरत मराठे व प्रशांत भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा प्रारंभ करण्यात आल्या
स्पर्धा प्रमुख पंच म्हणून क्रीडा शिक्षक प्रवीण शिंदे यांनी काम पाहिले.
या उपक्रमासाठी संस्था अध्यक्ष सुभाष भामरे व मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण, डॉ प्रा.दिलवरसिंग गिरासे, भावेश पाटील . यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले तर ऐ के पाटील, संतोष आडगाये, , प्रविण शिंदे, देवीदास मोरे यांचे सहकार्य लाभले.