त-हाडीत त-हाडीत कानुबाई माता उत्सव माता उत्सव
त-हाडी (प्रतिनिधी)
त-हाडी तालुका शिरपुर येथे खान्देशाची आराध्य दैवत कानुबाई माता स्थापन दिनांक १० ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी होणार आहे तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार दिनाक १० ऑगस्ट २०२४ रोजी उत्सवाची सुरुवात मातेचे रोट नेमण्यापासून होणार आहे दिनाक ११ ऑगस्ट २०२४ मातेची स्थापना होणार आहे
दिनाक १२ ऑगस्ट २०२४ रोजी तापीनदी परिसरात विसर्जन होणार आहे विसर्जनाच्या दिवशी उत्सवाला उधाण आलेला असतो गावात कानुमाता स्थापनेचा उत्सव साजरा करण्यासाठी गावकऱ्यांची बैठक घेण्यात आली चर्चेअंत उत्सव साजरा करण्याचे ठरल्यानंतर दंवडी , गावातील व्हाट्सअप, ग्रुपमध्ये मेसेज देण्यात आली होती आणि तेव्हापासून वुद्ध ,महिला, पुरुष, उत्सवाच्या तयारीला लागले आहेत जागरणाच्या दिवशी विविध भक्ती पर कार्यक्रम होणार आहेत श्रवण महिन्यात येणारा हा उत्सव प्रत्येक गावात कुटुंबात साजरा केला जातो यालाच कानबाईचा रोट असे म्हणतात कनुबाई उत्सवात रोट विधीला महत्त्व आहे
ज्या ज्य घरात कानबाईची कुलाचाराने स्थापन केला जातो अशा सर्व कुटुंबात रोट केला जातात श्रावणातील हा उत्सव नागपंचमीनतर पहिल्या रविवारी येतो या रोटसठी गहू घेतले जातात ते सव्वा मापात घेतले जातात सव्वा शेर सव्वा पायली अशा प्रकारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे एक मुठ याप्रमाणे यात वाढविली जाते एखाद्या घरात पुत्रप्राप्ती होणे व त्याच दिवशी त्या घरातील गाईला गो-हा होणे हा शुभसंकेत समजून येणाऱ्या श्रावणात कानबाईचे रोट केला जातात उत्सव दरम्यान केलेला स्वयंपाक त्याच दिवशी न संपल्यास तो दुसऱ्या दिवशी खातात कानबाईची स्थापन करण्याची जागा प्रथम शेणाने सारवली जाते
तेथे चैरग ठेवला जातो आणि त्यावर लाल वस्त्र टाकून मुखवटा किंवा नारळ ठेवतात त्या नारळाच्या किंवा मुखवट्याला सर्व प्रकारचे दागिने चढवून त्याची पूजा केली जाते कुंकू बिदी नथ चढविली जाते भोजनासाठी तांदळाची खीर गंगाफळ किल्लु तांदूळी आदी भाज्या शिजवलेले हरभरे व डाळ वाफलेले मठ पदार्थ असतात स्वयंपाकासाठी सर्वत्र चुलीचाच वापर होते
नैवेद्य
पोळ्याना रोट तादळाच्या खिरीस साखर शिजवलेल्या हरभऱ्याना मनुका नारळ भातास मोगरा अशा विशिष्ट नावाने संबोधले जाते कानबाईच्या नैवेद्य चा रोट खाण्याचा अधिकार फक्त कुटुंबातील व्यक्तीनाच किंवा भाऊबंदकीतील लोकानाच असतो रविवारी स्थापना केलेल्या कानबाईचे सोमवारी वाजत गाजत विसर्जन केले जाते विसर्जनाच्या वेळी कानबाई समोर पाणी व कुंकूवाचे सडे टाकले जातात नदीकठी कानबाईचे विसर्जन करतात विसर्जनाच्या ठिकाणावरील वाळू घरी आणून तिचे कस्तुरी म्हणून जतन केले जाते कानबाई विसर्जनानतर घरामध्ये लावलेला दिवा पौर्णिमेपर्यत तेवत ठेवला जाते ही प्रथा अजूनही काही ठिकाणी सुरू आहे
फोटो