कोंढावळ ता. शहादा येथील क्रांतिज्योती माध्यमिक विद्यालयात शिक्षण सप्ताह निमित्त विविध उपक्रम संपन्न झाले.
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या शिक्षण सप्ताह कार्यक्रमांतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या विद्यालयात शिक्षण विभागाने नेमून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पहिल्या दिवशी अध्ययन अध्यापन दिवस संपन्न झाला .तसेच दुसऱ्या दिवशी ता.२३ रोजी मूलभूत संख्याज्ञान आणि साक्षरता दिवस व तिसऱ्या दिवशी ता. २४ जुलै २०२४ रोजी क्रीडा दिवस मनवण्यात आला विद्यार्थ्यांना या दिनानिमित्ताने विविध खेळांचे ज्ञान तसेच शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापन स्टोरी कार्ड,चित्रे, विद्यार्थ्यांचे उच्च गुणवत्ता व नियमित मूल्यांकन करण्यासाठी समुदायाने कार्यक्रम करणे किती फायद्याचे असते या सर्व बाबतीतले ज्ञान विद्यार्थ्यांना दिले.
खेळातून शिक्षण तसेच दूरदर्शनवरील फिल्म व विविध साहित्याच्या मदतीने तसेच गोष्ट, गणितीय खेळ, जादुई पेठारातील साहित्य यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण देणे उपयुक्त कसे ठरते याविषयीचे मार्गदर्शन विषय शिक्षक सांस्कृतिक समिती अध्यक्ष प्रमोद परदेशीं,धनराज जगताप ,रोहिदास खैरनार, वाय. एस. शिंपी, गोरख वाल्हे,कैलास सैंदाणे, श्रीमती मंदाकिनी माळी, सुलोचना सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक जिभाऊ माळी यांनी कार्यक्रमांचे नियोजन केले. विद्यालयाचे शिक्षेकेत्तर कर्मचारी रविंद्र माळी, रविंद्र बागुल, सप्नील बैसाणे बांधवांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.