शिरपूर हॉटेल धाब्यावर एकदा कढईत खाद्यपदार्थ तळण्याकरीता घातलेले तेलाचा वापर वारंवार होतो ..अन्न व औषध प्रशासन मात्र जाणुन बुजून दुर्लक्ष
शिरपूर तालुका प्रतिनीधी … शिरपूर:-शहरातील विविध हॉटेल,गाडा, धाब्यावर एकदा का कढईत खाद्यपदार्थ तळण्याकरीता घातलेल्या तेलाचा वापर वारंवार होत आहे “नियमांची ऐसी तैसी”करत नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत याकडे अन्न व औषध प्रशासन मात्र जाणुन बुजून दुर्लक्ष करीत असल्याच सुज्ञ नागरिकांतून बोलल्या जात आहे. .
सदर, शिरपूर शहरातील व तालुक्यातील हॉटेल मध्ये एकदा कढाईत खाद्यपदार्थ तळण्याकरिता घातलेल्या
तेलाचा वारंवार वापर केल्याची बाब सर्वत्र पाहवयास मिळत आहे. हा नागरिकाशी जीवघेणा खेळ असून, या बाबतीत संबंधित अन्न व औषध प्रशासनाला माहीत असुनही सदर विभाग काहीच आतापर्यंत कधी कारवाई केल्याचे किंवा या बाबतीत कोणत्याही प्रकारची जनजागृती केल्याचे दिसून येत नाही ,आलही नाही.शिरपुर शहर व तालुक्यात संबंधित विभागाकडून नियमित तपासणी होत नसल्याने या बाबतीत नव्या नियमाची’जनजागृती’ होत नाही.फेरीवाले,हॉटेल,रेस्टॉरेट हायवे रोडवरील धाबे,यामध्ये खाद्यपदार्थ तयार करत असताना तेलाचा मोठ्या प्रमाणात पुनर्वापर होतो.
एकदा
तळण्यासाठी घातलेले तेल वारंवार वापरणे शरीरासाठी किती घातक आहे?आरोग्याच्या दृष्टीने किती हानिकारक आहे ?या बाबतीत प्रशासनाने कडक निर्बंध
आणलेले आहेत.मात्र नियमांची”ऐसी की तैसी”‘भारतीय फूड सेफ्टी स्टॉडर्ड अथॉरिटीने केलेल्या सुचनेवरून सदर निर्बंध लागू केले असल्याची माहीती मिळाली आहे.तळलेल्या तेलाचा पुन्हा वापर नियमबाह्ह ठरतो.त्यानुसार संबंधित विभागाकडून कारवाई
अपेक्षित असतांना मात्र सदर विभागाकडे मनुष्य बळ नसल्याच कारणे पुढे करण्यात येत आहे. या बाबतीची मोहीम अन्न प्रशासनाने राबवली नसल्याची माहीती असुन, शिरपूर शहरात व तालुक्यात शेकडो हॉटेल रेस्टॉरेट धाबे आहेत. तसेच हातगाड्यावर खाद्यपदार्थ तयार केले जातात.खाद्य तेलाचा पुनर्वापर केल्याने त्याचे सेवन केल्याने आरोग्य करिता किती घातक आहे.या
संदर्भात जागृती होणे आवश्यक आहे.
एकदा का कढईत खाद्यपदार्थ तळण्याकरीता घातलेल्या तेलाचा वापर वारंवार होत आहे “नियमांची ऐसी तैसी”करत नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत याकडे अन्न व औषध प्रशासन मात्र जाणुन बुजून दुर्लक्ष करीत असल्याच सुज्ञ नागरिकांतून बोलल्या जात आहे हि होणारे प्रकारावर वेळीच अन्न व औषध प्रशासनाने लक्ष घालुन संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.