त-हाडी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
त-हाडी, ता. ३० : त-हाडी (ता. शिरपूर) ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मात्र ग्रामसभेला पशु वैद्यकीय अधिकारी व महावितरण कंपनीने कर्मचारी
अनुपस्थित असणाऱ्या अधिकारी व अधिकाऱ्यांबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनुपस्थितीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा ठराव या ग्रामसभेने केला.
प्रशासकीय अधिकारी आर .जी. पावरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेला युवा व शेतकरी वर्गाने उपस्थिती दाखवली. सभेमध्ये गावातील आवश्यक कामांसह रस्त्याच्या व इतर शासकीय योजनांबाबत माहिती, मागील ग्रामसभेचा इतिवृत्ताचे वाचन ग्रामविकास अधिकारी देवीदास धाडे यांनी केले.
ग्रामसभेमध्ये लाडकी बहीण योजना, जन्म. मृत्यू. व विवाह नोंदणीचे करण्याचे आवाहन करण्यात आले मोहिमेअंतर्गत आर्थिक वर्षाचा विकास आराखडा तयार करणे, घरपट्टी व पाणीपट्टी, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नागरी सुविधा, ग्रामपंचायत निधी, , मनरेगा अंतर्गत अपूर्ण विकास कामे, १४ व १५ वा वित्त आयोग, आदि विषयांवर चर्चा झाली. त्याचबरोबर सन २०२३-२४ च्या अंदाज पत्रकास मंजुरी घेणे आदि विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली.
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या समोरील रस्त्याने ग्रामपंचायत पंचायत आजूबाजूला असलेल्या रस्त्यावर असले अस्वच्छता . या बाबत बैठकीमध्ये प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी प्रशासकीय अधिकारी आर जी पावरा यांनी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येईल अशी ग्वाही दिली. घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी यादीचे वाचन करण्यात आले. मात्र ज्यांना
शबरी आवास योजना, रमाई आवास योजना घरकुलाची आवश्यकता आहे. त्यांना ते न मिळता चांगली घरे असणाऱ्यांची नावे यादीत आल्याने ग्रामविकास अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना नागरिकांनी जाब विचारत पुनरसर्वेक्षणाची मागणी केली. माजी उपसरपंच ओंकार पाटील व अशोक सोनवणे, तापी परीसर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे, युवा कार्यकर्ते भुषण बागुल, विशाल करंके, मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण माजी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील .किरण भलकार.पोलिस पाटील ,विलास भामरे किरण अहिरे. गौतम अहिरे, अंगणवाडी सेविका, कृषी सहायक,आदि सहभागी झाले होते.