,संजय खरात यांचा आमदार जयकुमार गोरे यांचेहस्ते विशेष सन्मान.
खटाव तालुक्यातील शिक्षकांनी केले आयोजन.
सातारा ;
भारतीय अमृत वर्षाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खटाव तालुक्यातील शिक्षणप्रेमी शिक्षकांनी 'घरोघरी शाळा' उपक्रमाचे निर्माते वडगाव शाळेचे मुख्याध्यापक मा.संजय खरात यांच्या सत्कारासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माण खटावचे लोकप्रिय आमदार माननीय जयकुमार गोरे यांचे हस्ते तसेच सातारा जिल्हा भाजपा मुख्य प्रवक्ते मा.सदाशिवराव खाडे,माण पंचायत समितीचे सदस्य मा.सोमनाथ भोसले व आहे. मा.हरिभाऊ जगदाळे, एनकुळ गावाचे सरपंच मा.महादेव खाडे,सदस्य आहे. मा.ज्ञानेश्वर खाडे दहिवडीचे युवा नेते सिद्धार्थ गुंडगे, मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.अरुण खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.संजय खरात यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
संजय खरात सरांनी कोविडच्या अत्यंत कठीण परिस्थितीत 'घरोघरी शाळा' या अभिनव उपक्रमाची निर्मिती करून शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम केले असल्याचे मत आमदार साहेबांनी व्यक्त केले. खरात सरांचा 'घरोघरी शाळा' हा उपक्रम सर्वत्र राबवण्याची गरज असल्याचे मत भाजपा प्रवक्ते सदाशिवराव खाडे यांनी व्यक्त केले. अरुण खाडे म्हणाले की खरात सरांचे शैक्षणिक कार्य पाहून जिल्हा परिषद सातारा ,महाराष्ट्र शासन, तसेच दिल्लीतील संसदेमध्ये सुद्धा त्यांच्या शैक्षणिक कामाची चर्चा होते, हा खटाव-माण मधील शिक्षकांचा स्वाभिमान आहे.
सदर सत्काराच्या कार्यक्रमपूर्वी खटाव तालुक्यातील शिक्षणप्रेमी शिक्षकांनी घरोघरी शाळा उपक्रमास भेट देवून विद्यार्थी उपक्रमाची संपूर्ण माहिती घेतली.कु.अर्पिता ठोंबरे या विद्यार्थीची प्रगती पाहून तिला रोख रक्कम देवून तिचे विशेष कौतुक केले. खरात सरांचे शैक्षणिक काम पाहून त्यांचे कौतुक केले व भविष्यकाळातील शैक्षणिक कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण खाडे यांनी केले. सदर कार्यक्रमास मा.उपाध्यक्ष संपतराव मराठे, अपंग संघटनेचे सुनील खाडे, खटाव समितीचे कार्याध्यक्ष गोविंद माळवे, जिल्हा प्रतिनिधी संपतराव निकाळजे, तंत्रस्नेही शिक्षक बाबासाहेब केदार, उपक्रमशील शिक्षक सतीश खाडे व राजेंद्र खरात उपस्थित होते.






