पतंजली योग समिती व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांचा उपक्रम
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पतंजली योग समिती, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने विश्वशांती देव यज्ञ आयोजित करण्यात आला. अंतर्नाद योग केंद्र येथे पार पडलेल्या ह्या यज्ञकर्मच्या माध्यमातून विश्व शांती साठी प्रार्थना करतानाचा जग कोरोना संकटापासून मुक्त होवो व कोरोना विरुद्धच्या लढ्यात नागरिकांचे आध्यात्मिक व आत्मिक बल वाढावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. यज्ञाचे आयोजन पतंजली योग समिती व क्रिएटिव्ह फाउंडेशन ने नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या सहकार्याने आयोजित केले होते. यावेळी यजमान म्हणून उद्योगपती सारंग राडकर व सौ. ज्योती राडकर, सामाजिक कार्यकर्ते अभिजित फरांदे व सौ. हर्षदा फरांदे तसेच भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर व शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर होते. यावेळी समिधा अर्पित करण्यासाठी भारत स्वाभिमान न्यास चे राज्य प्रभारी भालचंद्र तथा बापू पडळकर, स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर,किरण देखणे गुरुजी,योग शिक्षिका स्वातीताई हिर्लेकर, जागृतीताई कणेकर,ज्योतीताई आवटी ,विद्याधर कानेटकर,सुनील क्षीरसागर,उज्ज्वला मोहोळकर,हेमंत बोरकर,बाळासाहेब धनवे, ऍड.प्राची बगाटे,अक्षय मोरे,सुमित दिकोंडा,सुधीर फाटक,श्री. दशपुत्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी गोविंदराव गाडगीळ यांनी पौरोहित्य केले. भारत स्वाभिमान न्यासाचे बापू पडळकर म्हणाले की कोरोना विरुद्ध च्या लढाईत योग भगाये रोग ह्या संकल्पनेचा उपयोग झाला, नियमित प्राणायाम व योग क्रिये द्वारे नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढली. आजच्या यज्ञाच्या माध्यमातून हे संकट दूर व्हावे यासाठी देव यज्ञ करून आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन मंजुश्री खर्डेकर यांनी केले.