शिरताव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे भिमराव निकाळजे यांची निवड
वरकुटे – मलवडी / वार्ताहर
माण तालुक्यातील शिरताव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे भिमराव दगडू निकाळजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शिरतावचे उपसरपंच नवनाथ शिंगाडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच सौ. स्वाती तुकाराम लुबाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत भिमराव निकाळजे यांची निवड करण्यात आली. या सभेसाठी किरण खळवे , वैशाली लुबाळ , सुनिता अहिवळे , अपूर्का चव्हाण , तानुबाई पिंगळे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक आय.ए.शेख यांनी काम पाहिले. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजी सह गूलालांची उधळण केली.
यावेळी उपसरपंचपदी भिमराव निकाळजी यांची निवड झालेबद्दल प्रा. सचिन होनमाने सर , ॲड विलास चव्हाण , उमाजी चव्हाण, कोंडीबा लुबाळ , पांडुरंग लुबाळ साहेब , शेंडे पाटील आदींनी अभिनंदन केले.







