पलूस ते वाझर विद्यार्थी सायकल रॅली व सामूहिक वाचन उपक्रमात शेकडोंचा सहभाग
अनेक मान्यवरांची उपक्रमास हजेरी*
कॉम्रेड मारुती शिरतोडे यांच्या अनोख्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद
माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन अर्थात वाचन प्रेरणा दिन व ग्रामीण कष्टकऱ्यांचे आदर्श प्रतीक कॉम्रेड बळवंतराव शिरतोडे यांचा दहावा स्मृतिदिन याचे औचित्य साधून,डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन तालुका पलूस,आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड ,जनसेवा वाचनालय वाझर यांच्या संयुक्त विद्यमाने कॉ.मारुती शिरतोडे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या पलूस ते वाझर भव्य विद्यार्थी सायकल रॅली व वाझर येथील सामूहिक वाचन उपक्रम याला आज भरभरून प्रतिसाद मिळाला.या अनोख्या उपक्रमात पलूस केंद्रातील लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूस,पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल पलूस, समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल पलूस,हिराई पब्लिक स्कूल पलूस, व जिल्हा परिषद शाळांतील सुमारे शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वतःची सायकल घेऊन पलूस ते वाझर सायकल रॅली त सहभाग घेतला
. आज पलूस मध्ये सकाळी सात वाजता छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पलूस नगरपरिषदेचे नगराध्यक्ष परशुराम शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आयुर्वेदतज्ञ डॉ.चंद्रकांत पवार यांनी झेंडा दाखवून रैली चे उद्घाटन करण्यात आले.जातायेता वीस किलोमीटरच्या या सायकल रॅलीत100 पेक्षा जादा विद्यार्थी, शिक्षक ,डॉक्टर ,सामाजिक कार्यकर्ते, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वाझर येथे मारुती शिरतोडे यांच्या निवासस्थानी ही रॅली पोहोचल्यानंतर माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम व कॉ. बळवंतराव शिरतोडे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व सुमारे तीनशेपेक्षा जादा विविध प्रकारची पुस्तके सामूहिक वाचनासाठी मुलांना उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना वाचन उपक्रम व सायकलिंगचे महत्व नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सैन्य दलाच्या स्पर्धेत सायकलिंग मधील महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे मानांकन प्राप्त प्रा.डॉ.नवनाथ इंदलकर, ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत भाई व्ही. वाय.पाटील, आयुर्वेद तज्ञ डॉ.चंद्रकांत पवार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल पवार, पंडित विष्णू दिगंबर हायस्कूलचे मुख्याध्यापक टी.जे. करांडे ,पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख उदयकुमार रकटे, जिल्हा परिषद शाळा नंबर 1 पलूस चे वरिष्ठ मुख्याध्यापक राम चव्हाण आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात ब्रिगेडचे शोसल मिडीया प्रमुख महेश मदने यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमीत्त पंधरा पुस्तके विद्यार्थ्यांना भेट दिली.
यावेळी सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र,एक पुस्तिका देऊन सन्मान करणेत आला.या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कॉम्रेड मारुती शिरतोडे यांनी केले तर आभार हिम्मतराव मलमे यांनी मानले. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन बालभारती चे सदस्य बाळकृष्ण चोपडे यांनी केले. समारोप प्रसंगी संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन डॉ.उमेश पाटील यांनी घेतले.या उपक्रमात आदित्य माळी ,डॉ.संतोष देसाई, कृष्णा पवार ,एस एन पाटील, सुनील पुदाले, एस डी.माने ,महेश मदने ,डॉ.चंद्रकांत पवार, डॉ. उमेश पाटील,डॉ. अश्विनी चव्हाण, आदी स्वतःसायकल घेऊन सहभागी झाले व उपस्थित राहिले होते तर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्याध्यक्ष दगडू जाधव ,प्राचार्य तानाजीराव चव्हाण, प्रा. धनराज चौगुले ,आदम पठाण ,संतोष खेडकर ,बाळासाहेब खेडकर, आण्णासो जुगूळकर,वाझर चे सरपंच संजय जाधव ,सरपंच हणमंतराव जाधव, जगन्नाथ आडके, प्रकाश निकम, शहाजी शिरतोडे , वैभव शिरतोडे,विशाल शिरतोडे,विक्रम शिरतोडे, अविष्कार मदने,सह अनेक मान्यवर होते.