• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

म्हसवड मध्ये खुलेआम गुटखा व मावा विक्री

माणगंगा by माणगंगा
October 17, 2021
in सातारा जिल्हा
0
म्हसवड मध्ये खुलेआम गुटखा व मावा विक्री

म्हसवड मध्ये खुलेआम गुटखा व मावा विक्री

  • म्हसवड बनतेय गुटखा तस्करीचे केंद्र
  • गल्लीबोळात अड्डे
  • बनावट तंबाखूचा वापर
  • यंत्रणेचा मात्र कानाडोळा

वरकुटे – मलवडी / वार्ताहर

राज्य शासनाचे बंदी आदेश पायदळी तुडवत माण तालुक्यातील म्हसवड शहरासह ग्रामीण भागात गुटखा व मावा विक्री जोमात सुरू आहे . मात्र कारवाईकडे कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे म्हसवड शहरात एस.टी स्टँण्ड , मुख्य चौकासह गल्लीबोळातून खूलेआम गुटखा व मावा विक्रीचा बाजार सुरू आहे. माव्यासाठी बनावट सुंगधी तंबाखूचा सर्रास वापर सुरू आहे.


माण तालुका कोरोनाच्या रेडझोन मध्ये होता. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले आहे. गेल्या दीड वर्षांपासून लाँकडाऊन होते सध्या लाँकडाऊन शितील केले आहे. अत्यावश्यक सेवेसह सर्व वस्तूंना परवानगी देण्यात आले आहे.


लाँकडाऊनच्या काळात दारु ,पानपट्टया बंद ठेवण्याचे प्रशासनाने आदेश देण्यात आले होतेसध्या आता दारू व पानटपऱ्या उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र गुटखा विक्री करण्यास बंदी कायम ठेवण्यात आली आहे. गुटखा व मावा विक्री सुरू असल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. परंतु तिकडे कानाडोळा करण्यात येत आहे.


म्हसवड शहरात एस. टी. स्टँण्ड परिसर , शिंगणापूर चौक , महात्मा फुले चौक , दत्त चौक , विठ्ठल मंदिर चौक , शिवाजी चौक , हायस्कूल परिसर , मुख्य बाजार पेठ , सिध्दनाथ मंदिर परिसर , पोलिगुटखा तस स्टेशन रोड , खाणीजवळील दुकाने अशी मावा विक्रीची हाँटस्पाँट ठरली आहेत. गुटखा , मावा पानटपाऱ्यांंवर अन्न व औषध प्रशासन कारवाई करते . पंरतु कोरोना संसर्गामुळे गुटखा व मावा विक्री बंद आहे , असा समज असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारवाई देखील थंडावली आहे. त्यामुळे चोरट्या पद्धतीने गुटखा व मावा विक्री करणाऱ्यांंचे फावले आहे.


म्हसवड शहरात अनेक कंपनीच्या गुटखा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ३१० , ३०० , १२० मिश्रण आणि तीन हजार या नंबरच्या पत्तीच्या माव्याला चांगली मागणी आहे. तसेच गंधक सुपारी , मंगलोर डबल डोस अशा माव्याचीही चलती आहे.


म्हसवड शहर सध्या गुटखा तस्करीचे केंद्र झाले आहे. सध्याच्या परिस्थितीला म्हसवड शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी व विक्री जोमात सुरू आहे. म्हसवड येथील सर्वात मोठी बाजारपेठ असून गुटखा साठवण्याची हे प्रमुख केंद्र बनले आहे. स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अन्य जिल्ह्यातून तस्कारांचा म्हसवडकडे कल वाढला आहे. राज्य शासनाने गुटखा बंदी लागू केल्यानंतर म्हसवड येथील गुटखा विक्रीकर कोणताही परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे. गुटखा व्यवसायाकडे दिवसेंदिवस तरुणाचा कल वाढत असल्याचे दिसत आहे. म्हसवड शहरात अनेक छोट्या मोठ्या होलसेल व्यापाऱ्यांकडे गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.


जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला म्हसवड शहर असल्याने प्रशासनाचे या शहराकडे विशेष लक्ष नसल्याने याचा फायदा अनेक गुटखा विक्रेते व त्यांना माल पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांनी उचलला आहे. प्रशासन डोळेझाक करत असल्याने गुटखा तस्कारांनी माण तालुक्यातील बस्तान बसवले आहे. म्हसवड शहर हे सातारा – सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असल्याने याठिकाणी मालाची ने – आण करणे सुलभ होत आहे. अन्य ठिकाणी चोरून असणारी विक्री म्हसवड व परिसरात खुलेआम सुरू आहे. शहरात अनेकवेळा कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होते. या सर्व प्रकारात स्थानिक प्रशासन गांधारीची भुमिका घेत व्यावसायिकांनी कोणत्याही कारवाईची भितीच राहिलेली नाही.


जिल्हा अन्न व औषध प्रशासन कधी कारवाई करणार ? अशा प्रकारची अनेक छोटी – मोठी गोदामे म्हसवड शहरात राजरो कार्यरत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे आर्थिक लागेबांध्यामुळे कारवाई होत नसल्याची चर्चा पण सुरू आहे.

कारवाई करणाऱ्यांंनाच लागते कीक

म्हसवड शहर आणि ग्रामीण भागात खुलेआम गुटखा व माव्याची विक्री करण्यात येत आहे. गुटखा व माव्याची विक्री करणाऱ्यांंवर कडक कारवाई करण्याचे आदेश आहेत. पंरतु ज्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यापैकी काहींच्या तोंडात गुटखा व मावा असल्याचे दिसून येते. त्यामुळे कुंपुणच शेत खात असेल तर माव्याची किक हवी असणारे कारवाई काय करणार , असा प्रश्न उपस्थित होत आहे.

           *जादा दराने विक्री*

तीस रुपयापासून ते ६० रुपयांपर्यंत छोट्या प्लास्टिक पिशवीत हाफ व आणि फूल असे दोन प्रकार आहेत. लाँकडाऊनपूर्वी २५ रुपयांना मिळणारा ओरिजनल हाफ मावा आता ३० रुपयांना भेसळीचा मिळतो . पन्नास रुपयांच्या माव्याला आता ६० ते ६५ रुपये मोजावे लागते.

Views: 497
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
पुसद येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न ; असंख्य कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश….

पुसद येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न ; असंख्य कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)