ऋषीकेश कदम यांची आयआयटी साठी निवड
वरकुटे – मलवडी / वार्ताहर
माण तालुक्यातील शेनवडी गावचे सुपुत्र व कोईमतूर येथील सुप्रसिद्ध सोने – चांदीचे व्यापारी श्री उत्तमराव विठ्ठल कदम व आई सौ. आशा कदम यांचे चिरंजीव ऋषीकेश कदम यांची भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या ( आय आय टी ) गणित व संगणकीय तंत्रज्ञ या इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी निवड झालेली आहे.
ऋषिकेश कदमची आयआयटीला निवड झालेला शेनवडीतील दुसरा विद्यार्थी आहे. यापूर्वी ऋषीकेश कदम याची मोठी बहिण कु.शरयू उत्तमराव कदम हिची निवड झाली आहे. कु. शरयू कदम हिची पुढील शिक्षणासाठी भारत देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था आयआयटी मुंंबई येथील पवई तीन वर्षांपूर्वी तीची निवड झाली आहे. सख्खे बहिण – भावाची आयआयटी मध्ये निवड होण्याची माण तालुक्यातील एकमेव घटना आहे.
भारत सरकारच्या अखत्यारीत आय आय टी या स्वायत्त व देशातील सर्वात्तम शैक्षणिक संस्था समजल्या जातात. सख्या बहीण – भावाला साँफ्टवर इंजिनिअर होऊन आपल्या देशाची सेवा करायची आहे. माण तालुक्यातील सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे नेहमीच निसर्गाशी झुंज देत असतानाच माणदेशी माणसांमध्ये परिस्थितीशी संघर्ष करण्याची ताकद निर्माण झाली आहे. माण तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या शेनवडी येथील कु.शरयू कदम व चि. ऋषीकेश कदम या बहीण – भावाची आयआयटीसाठी निवड झाली आहे.
या बहीण – भावाला आई सौ. आशा कदम व वडील उत्तम कदम यांनी मार्गदर्शन केले आहे. या बहीण – भावाच्या यशाबद्दल आजोबा विठ्ठल कदम , एच.के.जगताप सर , सातारा जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेचे संचालक अनिल देसाई , जि. प. सदस्या सुवर्णा देसाई , पं.स.सदस्या सौ.चंद्राबाई आटपाडकर , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय जगताप , भाजप माण तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे , माण तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विक्रम शिंगाडे , सरपंच सौ.लिना कदम , सरपंच बाळकृष्ण जगताप , माजी सरपंच मोहन कदम , माजी सरपंच संजय खिलारी , माण तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय जगताप , युवा उद्योजक धिरज जगताप , माजी सरपंच जयसिंग नरळे , माजी चेअरमन हणमंत आटपाडकर आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.







