कराड रामोशी समाज नेते आनंदराव जाधव (शेरे) यांची भेट
कराड ;
चार-पाच दिवसापूर्वी कराड तालुक्यात डोगर पायथ्याशी असणाऱ्या म्होपरे गावातील बेघर वस्तीवर राहणाऱ्या श्रीमती चांदणी अनिल शिरतोडे या रामोशी समाजातील महिलेचे घर आगीत जळून भस्मसात झालेची घटना घडली असलेचे समाज माध्यमातून समजले.
यावेळी गाभण गाय भाजून गंभीर जखमी झाली व ती मरणहि पावली. तसेच सर्व संसार उपयोगी साहित्य नष्ट झाले. क्षणात होत्याचे नव्हते झाले अन एका गरीब विधवा निराधार महिलेचा संसार उघड्यावर पडला. ही अतिशय दुःखदायक वाईट घटना समजताच ताबडतोब रामोशी समाजाचे नेते आनंदराव जाधव (शेरे) यांनी म्होपरे गावास भेट दिली .घडलेले घटना स्थळ पाहिले व वस्तुस्थितीबाबत घरजळीत ग्रस्त कुटुंबाला तातडीच्या मदतीबाबत समाज माध्यमातून आवाहन केले.
अशी संवेदनशीलता दाखवणारा आनंदराव जाधव सारखा नेता रामोशी समाजाचा खराखुरा मार्गदर्शक आहे. गेली अनेक वर्षे आम्ही आनंदराव जाधव या व्यक्तीला रामोशी समाज संघटनेमध्ये काम करताना पाहतोय. ते कोणत्या जरी संघटनेत काम करीत असले तरी समाजाप्रतीची तळमळ, आस्था कमालीची त्यांच्या ठाई ठाई भरून उरलेली आहे.त्यामुळे कुणी निंदा..कुणी वंदा्््मला काय त्याचे?…मी मात्र समाजासाठी काम करतच राहणार अस तोंडावर परखडपणे बोलणारा अन हाक दिल त्या ठिकाणी पोहोचणारा आदर्श समाजबांधव आहे
.त्यामुळे हे व्यक्तीमत्व सर्वांना भावते.कालच मला आनंदराव जाधव नानांचा फोन झाला.झालेल्या घटनेबाबत व इतर संघटनात्मक कामाबाबत बोलणे झाले.आम्ही आज सायंकाळी म्होपरेला येतोय एवढेच मी नानां ना बोललो.आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सायंकाळी उशिरा म्होपरे ला जाऊन गावानजीकच्या बेघर वस्तीला भेट दिली.तर नाना आमच्या अगोदर तासभर तिथे पोहचून समाज बांधवाना सोबत घेऊन आमची वाट पाहत बसले होते.
आम्ही पोहचलो तेव्हा तिथे नेते आनंदराव जाधव सह,कराड तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य लक्ष्मण जाधव ,डॉ. पोपट जाधव ,युवा कार्यकर्ते सागर जाधव व समाजातील काही बांधव उपस्थित होते. घरजळीत ग्रस्त कुटुंबाची भेट आम्ही सर्वांनी भेट घेतली.जळीत घराचे ठिकाण पाहिले.खूप वाईट वाटले.पदरी चार चिलीपिली असणारी महिला ,मजूरी करुन घरसंसार चालवत आहे.आपल्या मुलींना शाळाही शिकवत आहे.त्यातच असा कुंटूंबावर आलेला घाला..या घटनेने हे कुटूंब आतून पूर्ण उध्वस्त झालेचे जाणवतेय.अन्न,वस्त्र,निवारा,आरोग्य अन शिक्षण हे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरु झाले तरी या देशातील काही कोटी लोकांच्या पर्यत पोहचलेले नाही ही वस्तुस्थिती जाणवतेय.गोरगरीबांच्या झोपडीपर्यत स्वातंत्र्याचा लाभ पोचवायचा असेल तर शासनाने फार कागदी निकषात अडकून न बसता कोणत्याही आपत्तीत तातडीने वस्तुस्थिती दर्शक अहवाल गावपातळीवरील सरकारी कर्मचार्याकडून घेऊन तातडीने मदत पोहोचवायला हवी.पण हे घडताना दिसत नाही.
या कुटूंबाचे घर जळून चार पाच दिवस झाले.समाजातून लोक मदत करीत आहेत.शासनानेही तातडीने मदत करावी अशी विनंती आम्ही करतो.आम्ही काल काही कपडे,मुलांना शैक्षणिक साहित्य, यथाशक्ती आर्थिक मदत या कुटुंबाला करून आलो. परतीच्या प्रवासात रात्री उशिरा मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी संदीप मदने यांची भेट झाली. डॉक्टर कृष्णा मदने यांचे फोनवरून बोलणे झाले. कराड तालुक्यात रामोशी समाज सुधारावा,त्याची प्रगती व्हावी, त्याला अडचणीत मदत करावी म्हणून जी काही मंडळी काम करताना दिसून येतात त्यात आनंदराव जाधव असतील,प्रशांत चव्हाण असतील, डॉक्टर कृष्णा मदने असतील ,संदीप मदने असतील,भंडलकर सर असतील,सागर जाधव असतील ही सगळी माणसं तळमळीने काम करताना आढळून येतात. या सगळ्यांच्या कामाला आमच्या शुभेच्छा.आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या कुटूंबाला भेट देऊन आधार दिला.यथाशक्तीप्रमाणे मदत केली त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. तसेच जळीतग्रस्त निराधार कुटुंबाला आधार देण्यासाठी समाजातील संवेदनशील व्यक्तींनी अजूनही यथाशक्ती मदत करावी असे आवाहन आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र च्या वतीने आम्ही करीत आहोत.
काल माझ्यासोबत या ठिकाणी आलेले राज्याध्यक्ष मा.दगडू जाधव,राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे,राज्य सल्लागार आदित्य माळी ,राज्य संघटक बाळासाहेब खेडकर,संतोष खेडकर कोषाध्यक्ष महेश मदने अशा सर्वांच्या वतीने या कुंटूंबाचा निवारा पुन्हा उभारून देण्यासाठी समाजातील संवेदनशील व्यक्तीनी मदत करावी असे आवाहन करतो….
मारुती शिरतोडे
राज्य निमंत्रक, आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र







