पावसाळ्यापूर्वी शेळ्या मेंढ्या चे लसिकरण करून घ्या…मेंढपाळ आर्मी प्रमुख अर्जुन थोरात
प्रतिनिधी दि.२५
महाराष्ट्रात सगळीकडे पावसाळा सुरू होत असुन पशुधनावर मोठ्या प्रमाणात आजार बळावत आहेत. त्यांचे योग्य वेळी निदान करणे गरजेचे असुन, शेळ्या मेंढ्यांचे त्वरित लसीकरण करण्यात यावे. असे मत मेंढपाळ आर्मीचे राष्ट्रीय सांसद प्रमुख अर्जुन थोरात यांनी व्यक्त केले. ते मेंढपाळ आर्मी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते
यावेळी मेंढपाळ आर्मी चे प्रमुख अर्जुन थोरात म्हणाले, पावसाळ्यात मेंढ्या शेळ्या घोडी व कुत्री यांना साथीचे आजार बळावतात. त्यामुळे मेंढपाळांचे अतोनात नुकसान होते. त्यावर उपचार होईपर्यंत शेळ्या मेंढ्या व अन्य पशुधन दगावते.याकरीता राज्याचे पशुसंवर्धन मंत्री यांनी सतर्क राहून तातडीने निर्णय घेत मेंढपाळ व पशुपालकाचे हित जपत शेळ्या मेंढ्यांचे लसिकरण त्वरित करावे.
तसेच पशुधन पर्यवेक्षक मेंढपाळांची पिळवणूक करत आहेत असे म्हणत त्यांनाही यावेळी श्री थोरात यांनी खडे बोल सुनावले मेंढ्या व शेळ्यांचे लसिकरण थेट वाड्यावर जाऊन करणे अनिवार्य असताना, अधिकारी दवाखान्यातून लसी मेंढपाळांना देतात असे कामचुकार अधिकारी निलंबित करण्यात यावेत असे ही श्री थोरात म्हणाले
त्याचबरोबर सरकारी दवाखान्यातून मेंढपाळांची टेहाळणी, अथवा शासकीय रकमेपेक्षा जास्त रक्कम वसूल केल्यास पशुधन अधिकार्यास मेंढपाळ आर्मी स्टाईलने धडा शिकवला जाईल असेही मेंढपाळ आर्मी प्रमूख अर्जून थोरात यांनी नमूद केले.