गजीनृत्य लोकसंस्कृतीची जोपासना करण्याचे अजित काबुगडेचे कार्य कौतुकास्पद :- डॉ दिलीपराव येळगावकर
मायणी :- दत्ता कोळी
धनगरी गजे,ढोल नृत्य हा लोककनृत्याचा एक लोकप्रिय प्रकार असून महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, कर्नाटकात या गजे ढोल,नृत्य प्रसिद्ध असून या लोकसंस्कृतीची जोपासना करण्यासाठी आपले आयुष्य वाहून घेणाऱ्या अजित काबुगडे या युवकाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांनी मायणी याठिकाणी काढले.
अजित काबुगडे यांच्या ३२ व्या वाढदिवसानिम्मित भागातील धनगरी गजी मंडळांकडून आयोजित त्यांचा सत्कार समारंभात डॉ येळगावकर बोलत होते.यावेळी सरपंच सचिन गुदगे,धनगर विठोबा ट्रस्ट चे अध्यक्ष रघुनाथ कचरे, ग्रा.स.विजय कवडे,दत्तात्रेय काबुगडे,नितीन पडळकर,मायणी परिसर पत्रकार संघ दिलीप पुस्तके,माजी उपसरपंच आनंदा शेवाळे,मोहन दगडे,राजाराम कचरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सरपंच सचिन गुदगे म्हणाले, आपली लोकसंस्कृती कायम ठेवली पाहिजे. या भावनेतून आजच्या आधुनिक काळातही या शेळी-मेंढी पालन, लोकर तयार करणे , घोंगड्या तयार करणे या धनगरी पारंपरिक व्यवसायाबरोबरच लोप पावत चाललेल्या गजी नृत्यास जीवित ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या अजितची तळमळ वाखाणण्याजोगी आहे.म्हणून मायणी धनगर विठोबा गजी मंडळाच्या ‘वस्ताद’पदापर्यंत त्यांची वाटचाल झाली आहे.
सदर कार्यक्रमात विविध गावचे गजी मंडळ कार्यकर्ते,व मायणी येथील अजित काबुगडे मित्र परिवार सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाराम कचरे व सूत्रसंचलन व आभार दत्ता कोळी यांनी केले.







