नवनाथ बागेस कृषि, पर्यटन, सामाजिक व अध्यात्मिक प्रकल्प घोषित करा.:स्वातीताई मोराळे
देशात कृषि, पर्यटन,सामाजिक व अध्यात्मिक असे सर्व एकत्रित असणारा पहिला प्रकल्प आहे. प्रकल्प घोषित झाला तर लाईट,रस्ते व इतर कामांसाठी निधी उपलब्ध होईल. आज मराठवाडा हा भाग अतिशय मागास असून वेरूळ अजिंठा सोडला तर पर्यटनासाठी खुप कमी ठिकाणे आहेत.
कृषि मध्ये 20हजार गोल्डन सीताफळ,1हजार नारळ,1हजार आंबा,1हजार चिंच,500जांभूळ इतर फळ झाडे 1हजार तर फुले व शोची 5 हजार अशी जवळपास तीस हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे.
पर्यटना मध्ये स्विमिंग पुल, रेन डान्स, बोटिंग, गार्डन, म्युजिकल फॉउंटेन, शॉपिंग सेंटर, हॉटेल लॉजिंग, मल्टीपर्पज हॉल,छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अहिल्यादेवी, भगवान बाबा, वामनभाऊ,स्व. गोपीनाथजी मुंढे साहेब यांचे पुतळे, स्व. गोपीनाथरावजी मुंढे साहेब व हिंदु हृदय सम्राट यांची फोटो गॅलरी उभारण्यात येणार आहे.यामध्ये स्विमिंग पुल, गार्डन, बोटिंगचे काम सुरु आहे.
सामाजिक प्रकल्पामध्ये वृद्धाश्रम, महिलाश्रम, बालाश्रम व गो शाळा सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये वृद्धाश्रम व गो शाळेचे काम सुरु आहे.
अध्यात्मिक प्रकल्पामध्ये प्रती पंढरपूर उभारण्यात येणारआहे.महाराष्ट्र मधील सर्वात उंच शिखर असलेले मंदिर बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे.असा कृषि, पर्यटन, सामाजिक व अध्यात्मिक एकत्रित प्रकल्प भारतात पहिलाच तयार होत आहे. याला जर पर्यटन स्थळ घोषित केले तर पर्यटकासाठी मूलभूत सुविधा निर्माण होतील. रोजगार उपलब्ध होईल. यासाठी नवनाथ बागेस पर्यटन स्थळ घोषित करावे अशी मागणी पर्यटन मंत्री मा. आदित्य ठाकरे यांच्या कडे नवनाथ बागेच्या डायरेक्टर मा. स्वातीताई मोराळे यांनी केली आहे.