रमेशशेठ सपकाळ यांची नॅशनल गोल्ड अँड सिल्व्हर असोसिएशनच्या संचालकपदी निवड
मायणी:- सतीश डोंगरे
मायणी गावचे सुपुत्र उत्तमराव सपकाळ फाउंडेशनचे अध्यक्ष व सेलमस्थित प्रसिद्ध गलाई व्यावसायिक रमेशशेठ सपकाळ यांची नॅशनल गोल्ड अँड सिल्व्हर असोसिएशनच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.
विटा याठिकाणी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतापदादा साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत रमेश शेठ सपकाळ यांची असोसिएशनच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
यानिमित्त मायणी याठिकाणी रमेशशेठ सपकाळ यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नूतन अध्यक्ष आप्पासो पुदाले,खटाव मार्केट कमिटीचे माजी संचालक दादासाहेब कचरे,कॅप्टन सुरेश जगदाळे,सुरेश पुदाले ,जनार्दन निकम, पोपट निकम, बाळू निकम, अंकुश रजपूत, नंदकुमार सुगदरे, गणीभाई नदाफ, शिवप्रसाद कुंभार ,अन्सार इनामदार ,दिपक सांळुखे तानाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष आप्पासो पुदाले म्हणाले, गलाई व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अधिक उलाढाल करणारा व्यवसाय आहे परंतु संपूर्ण भारतात पसरलेले आपले गलाई व्यावसायिक यांना अनेक समस्यांनी घेरले असून याची सोडवणूक करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष प्रतापशेठ साळुंखे यांनी सर्व गलाई व्यावसायिकांना एकत्र करीत ही असोसिएशन स्थापन केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पदाधिकारी व संचालक काम करणार आहेत.रमेश सपकाळ यांनी गलाई व्यावसायिक म्हणून नावलौकिक मिळवला आहेच परंतु त्यांचे सामाजिक कार्यही मोठे आहे यामुळेच त्यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी बोलताना दादासाहेब कचरे म्हणाले, गलाई व्यावसायिक म्हणून नावलौकिक मिळवलेले,समजुपयोगी व्यक्तिमत्व कै.उत्तमराव सपकाळ यांचा व्यवसायिकतेचा व सामाजिक वारसा रमेशशेठ सपकाळ यांनी समर्थ पेलला असून त्यांच्या या गुणवत्तेची पारख प्रतापशेठ साळुंखे यांनी करून त्यांची असोसिएशनच्या संचालक निवड करण्यात आली आहे.हा मायणी गावासाठी गौरव करणारा ठरत आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता कोळी व सूत्रसंचलन आणि आभार मिलिंद देशमुखे यांनी मानले.







