• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

म्हसवड आठवडा बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा….

माणगंगा by माणगंगा
January 13, 2022
in सातारा जिल्हा
0
म्हसवड आठवडा बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा….

म्हसवड आठवडा बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा

  • संक्रांतीच्या सणानिमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी
  • मास्कही दिसेनात
  • नियमांची पायमल्ली

वरकुटे – मलवडी / वार्ताहर

एकीकडे कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असताना केंद्र व राज्य शासन नवनवे निर्बंध लादत आहे. पंरतु माण तालुक्यातील म्हसवड येथील बुधवारच्या आठवडा बाजारात व जनावरांच्या बाजारात कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसून येते . सोशल डिस्टंसिंग तर सोडाच परंतु नागरिकांबरोबर अनेक व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर साधा मास्कही दिसून येत नाही. ” कोरोना आमच्याकडे नाहीच ” अशीच अवस्था बाजारात दिसून आली. संक्रांतीच्या सणानिमित्त म्हसवड बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.


देशात कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असताना शासन स्तरावरून कोरोनाचा जास्त प्रसार होऊ नये यासाठी नवे निर्बंध लादले जात आहेत. याचबरोबर प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेक भागात रात्रीच्या संचारबंदी बरोबर दिवसाही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु याउलट कोरोना संसर्गाला रोखण्याची आमची जबाबदारी नाहीच , अशा अविर्भावात म्हसवड येथील बुधवारच्या आठवडा बाजारात अनेकजण विनामास्क फिरताना दिसून आले, अनेक नागरिकांबरोबर रस्त्यावर बसणाऱ्या अनेक विक्रेत्यांनीही मास्क लावलेला दिसून आला नाही. म्हसवड येथील जनावरांचा हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार भरतो . त्यामुळे बाजारामध्ये अनेक ठिकाणी हुन पशुपालक व व्यापारी येत असतात . पंरतु जनावरांच्या बाजारातही कोरोना नियम पायदळी तुडवलेले दिसून येते. असे आठवडे बाजारात सध्या कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्गाची भिती व्यक्त केली जात आहे.

चौकट

निर्बधाबाबत भिती , मात्र नियमांची पायमल्ली

राज्य व केंद्र शासनाने कोरोनाचा संसर्गात वाढ होऊ नये म्हणून नवे निर्बंध लावत आहे. शासनाकडून प्रत्येक नागरिकांनी , नियमांचे पालन करावे असे आवर्जून सांगितले जाते. मात्र शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नाही. दुकानदारांना, व्यापाऱ्यांना निर्बधाबाबत भिती वाटते. तेच व्यापारी कोरोनाचे नियम पालन करीत नसल्याचे दिसून येतात. आता लाँकडाऊन पडणार की काय याबाबत चर्चा सुरू होते. मात्र चर्चा करणारेच कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येते.

Views: 297
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
बुद्ध सम्राट अशोकांना मानणारे आम्ही षंढ नाहीत.:- पँथर डॉ. राजन माकणीकर

बुद्ध सम्राट अशोकांना मानणारे आम्ही षंढ नाहीत.:- पँथर डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)