• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेतील हक्काचा माणूस : मान्यवरांची स्तुतीसुमने

माणगंगा by माणगंगा
January 17, 2022
in सातारा जिल्हा
0
उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेतील हक्काचा माणूस : मान्यवरांची स्तुतीसुमने

उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेतील हक्काचा माणूस : मान्यवरांची स्तुतीसुमने


मोराळे येथे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांचा नागरी सत्कार


मायणी:- दत्ता कोळी


सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये अनिल देसाई यांना जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड निवड झाली . त्याबद्दल मोराळे ता. खटाव येथील ग्रामस्थांकडून अनिल देसाई यांचा नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सलग चार टर्म ते सातारा जिल्हा बँकेमध्ये कार्यरत आहेत. नूतन उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सर्वसामान्य शेतकऱ्याचा हक्काचा माणूस व आधार असल्याची स्तुतीसुमने उपस्थित मान्यवरांनी देसाई यांच्यावर उधळली.
या कार्यक्रमास माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर, काँग्रेसचे नेते रणजीत भैया देशमुख ,राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार मोरे,जेष्ठ नेते जयसिंगराव शिंदे,काँगेसचे नेते संजीव साळुंखे ,शेतकरी संघटनेचे नेते भगत, पिंटूचाचा मोरे ,सरपंच संदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी अनिल देसाई यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, जिल्हा बँकेच्या माध्यमातून मोराळे गावासह भागातील युवकांसाठी त्यांना त्यांच्या पायावर उभा राहण्यासाठी बँकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असून , बँकेच्या विविध योजनेच्या मार्फत युवकांसाठी विविध प्रकारचे कर्ज देऊन त्यांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. युवकांना स्वावलंबी बनण्यासाठी मिळालेल्या आर्थिक आधाराने मोराळे गावातील युवक हा पैसा नसल्याने बेरोजगार राहणार नाही याची विशेष काळजी मी घेणार आहे.


यावेळी माजी आमदार दिलीप येळगावकर म्हणाले की,अनिल देसाई हे माझ्या चांगल्या परिचयाचे असून आम्ही बऱ्याच वर्षापासून सोबत आहोत. तसेच अनिल देसाई हा एक सच्चा कार्यकर्ता असल्याने त्याचे राजकारणामध्ये सर्व पक्षात चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या या चांगुलपणामुळेच जिल्हा बँकेची उपाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.अजून बरेच दिवस जिल्हा बँकेचे नेतृत्व करतील ,अशी खात्री यावेळी त्यांनी व्यक्त केली.


यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य नंदकुमार मोरे आपल्या भाषणात म्हणाले,मोराळे गावच्या विकासासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. तसेच अनिल भाऊ व आमच्या दोघांची चांगली मैत्री आहे आणि यापुढेही ती तशीच राहील.विकासाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं राजकारण केले जाणार नाही.


काँगेस नेते रणजित देशमुख म्हणाले ,उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहेच. परंतु अनिल देसाई यांच्या मुळे मला उद्योग क्षेत्रांमध्ये बँकेच्या माध्यमातून मदत झाली आहे. आम्ही पंचवीस वर्षे सोबत आहोत व आमच्या परीने आम्ही जेवढा भागाचा विकास करायचा प्रयत्न करत आहोत.जिल्हा बँकेत माझीही उमेदवारी असावी यासाठी अनिल देसाई यांनी प्रयत्न केले होते याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
तसेच या कार्यक्रमांमध्ये संजय साळुंखे ,शेतकरी संघटनेचे नेते भगत यांनी आपली मनोगते व्यक्त केली.


यावेळी अनिल देसाई यांचा मोराळे,मराठानगर, कलेढोण ,गोरेगाव गावातील कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी मोरळेचे उपसरपंच प्रतिनिधी किरण निकम,मराठानगरचे सरपंच शरद निकम,रणजित निकम,चितळी गावचे माजी सरपंच संतोष पवार,सामाजिक कार्यकर्ते हरिदास शिंदे,मनोजशेठ शिंदे,दादासो निकम,धीरज शिंदे यांचेसह विविध संघटनेचे पदाधिकारी, शेतकरीवर्ग,तरुण युवक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिंदे सर यानी केले तर आभार सुरज शिंदे यांनी मानले.

Views: 228
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
सरकारच्या आयचा घो ! कोरोनाच्या नावाखाली शिक्षणाचा बट्याबोळ.शासनाच्या शाळा बंदच्या निर्णयाला पालकांचा विरोध.

सरकारच्या आयचा घो ! कोरोनाच्या नावाखाली शिक्षणाचा बट्याबोळ.शासनाच्या शाळा बंदच्या निर्णयाला पालकांचा विरोध.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)