जिल्हा पत्रकारितेतील मौल्यवान हिरा हरपला
दैनिक पुणयनगरी चे उप संपादक मोहन दादा मस्कर पाटील यांचे थोड्याच वेळापूर्वी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अतिशय नम्र व professional reportism त्याचबरोबर सामाजिक ऐतिहासिक शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मापदंड सांभाळून वार्तांकन च्या माध्यमातून उत्तम आर्टिकल करणार्या मित्रावर असा आघात होईल असे स्वप्नात ही वाटले न्हवते. स्वकर्तुत्वाने पत्रकारितेतील उत्तुंग ठसा उमटवणारे हरहुण्णरी पत्रकार मित्राला ग्रामीण मराठी पत्रकार संघ आटपाडी तर्फे
भावपूर्ण श्रद्धांजली*💐💐😌😌
गुरुवर्य मोहनदादा,
तू म्हणाला होतास,
छातीत लागतो मित्रा हातभर कलेजा !!
हल्ली पत्रकार होणे आसान काम नाही
तू वेळ काढून लिहीत जा, रातीला !!
तू वेळ काढून लिहीत जा, रातीला
वार्तांकनातून न्याय दे माणदेशी मातीला!!
कुठ आडला, कोण नडला तर मी आहेच!!
तू लीहतोस छान, लिहीत चल,
कुठं आडलां तर फोन कर!!
प्रिय मोहन दादा ,
आता तुझी वाक्य आठवतात!!
मनात आठवणी दाटवतात
तू म्हणाला होता,
सातारला आल्यावर भेट!!
नियतीचा खेळ,!
आता वाटतय, तू होता तेव्हाच भेटायला हवं होत!
तू गेलास तरी ही आमच्यातच राहशील!!
आम्ही तुमचे विचार जिवंत ठेऊ
शोकाकुल-ग्रामीण मराठी पत्रकार संघ आटपाडी







