चाईल्ड उन्नती फाउंडेशनच्या वतीने माण तालुक्यात विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप
दहिवडी प्रतिनिधी
चाईल्ड उन्नती फाउंडेशनच्या वतीने माण तालुक्यातील तोंडले, घोडेवाडी, निंबाळकरवस्ती, जाधववाडी,खुडूकदरा, बळीपवस्ती, डांगेवाडी या सात गावांमध्ये पहिली ते चौथी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या आहेत. यामुळे या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होण्यास मदत होणार आहे.
यावेळी चाईल्ड उन्नती फाउंडेशनचे अध्यक्ष बोलताना दिलीप दडस म्हणाले की शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात या फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आम्ही आत्तापर्यंत मदत केलेली आहे. ही संस्था आगामी काळात ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संगणक सुद्धा वाटप करत आहे. संगणकाच्या माध्यमातून खेड्यातील विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतो.
यावेळी उपस्थित चाईल्ड फाऊंडेशन चेअरमन दिलीप दडस,टाकेवाडी मा. सरपंच जालींदर दडस, मा. सोसायटी चेअरमन रामदास दडस, दादा दडस, ज्ञानेश्वर दडस सर्व शिक्षक स्टाफ गावचे सरपंच व ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







