• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

कम्युनिटी सर्टिफिकेटचा तामिळनाडूत मुद्दा ऐरणीवर, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी रमेशशेठ सपकाळ यांनी घेतली मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट

माणगंगा by माणगंगा
February 12, 2022
in सातारा जिल्हा
0
कम्युनिटी सर्टिफिकेटचा तामिळनाडूत मुद्दा ऐरणीवर, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी  रमेशशेठ सपकाळ यांनी घेतली मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट

कम्युनिटी सर्टिफिकेटचा तामिळनाडूत मुद्दा ऐरणीवर, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी

रमेशशेठ सपकाळ यांनी घेतली मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट

मायणी:- सतीश डोंगरे

             एका राज्यातून दुसऱ्या राज्यात व्यवसायासाठी स्थलांतर होऊन त्याच राज्यात स्थायिक झालेल्या महाराष्ट्रतील नागरिकाला त्या राज्यातील शैक्षणिक सुविधा घेण्यासाठी लागणारे कम्युनिटी सर्टिफिकेट मिळण्यास तामिळनाडू राज्यातील प्रशासनाने गेल्या दोन वर्षांपासून नाकारल्याने त्या ठिकाणच्या असंख्य स्थानिकांच्या मुलांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याने या संदर्भात मूळ मायणी ता. खटाव येथील रहीवाशी असणारे सेलम स्थित गलाई व्यावसायिक,ऑल इंडिया गोल्ड अँड सिल्व्हर असोसिएशनचे संचालक व उत्तमराव सपकाळ फाउंडेशनचे अध्यक्ष रमेशशेठ सपकाळ यांनी थेट महाराष्ट्राचे विद्यमान मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे समवेत मिलिंद देशमुखे,रविराज खरात,संचित सगरे ,प्रसाद तिडकर यांची उपस्थिती होती. 

       भारत देश अनेक जातीधर्म समुदायांनी बनला असून अनेक प्रदेशांची  सांस्कृतिक,धार्मिक परंपरा अधोरेखित आहे म्हणूनच भारत देश विविधतेत एकता असणारा देश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील हजारो व्यक्ती व्यवसायानिमित्त देशभरात  पसरलेल्या आहेत. या व्यवसायामध्ये त्या व्यापाऱ्यांच्या अनेक पिढ्या त्याचठिकाणी वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे कायदयनुसार हे नागरिक त्याठिकाणच्या नागरिक्तवास मान्यताप्राप्त आहेत. तसेच ते त्या-त्या राज्यातील सुख सुविधा मिळण्यासाठी हक्कदार असूनही गेल्या काही वर्षांपासून तामिळनाडू या राज्यातील प्रशासनाने त्याठिकाणी बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या नागरिकांना मराठी (ब्राह्मणेतर) चे कम्युनिटी सर्टिफिकेट(समुदाय प्रमाणपत्र) देण्यास नाकारले असल्याने याप्रश्नी बाधित हजारो नागरिकांना सामाजिक व शैक्षणिक लाभांपासून वंचित रहावे लागत आहे. याप्रश्नी तामिळनाडू स्थित युवकवर्गाने रमेशशेठ सपकाळ यांची भेट आपली ही समस्या व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य शासनाकडून सदर प्रश्नी तोडगा काढता येईल का? हा प्रश्न केला.

      याप्रश्नांची तातडीने दखल घेत ऑल इंडिया गोल्ड अँड सिल्व्हर चे संचालक व उत्तमराव सपकाळ फाउंडेशनचे अध्यक्ष रमेशशेठ सपकाळ यांनी महाराष्ट्राचे नामदार मंत्री दत्तात्रय भरणे यांची मुंबई याठिकाणी मंत्रालयात भेट घेत संपूर्ण भारतभरात पसरलेल्या व विशेष करून तामिळनाडू राज्यातील गलाई व्यावसायिक व अन्य व्यापाऱ्यांना हा प्रश्न भेडसावत असून यामुळे विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक व सामाजिक सुविधांपासून वंचित राहत असल्याची कैफियत नामदार भरणे यांच्यापुढे मांडली. मराठी,मराठा (ब्राह्मणेतर), यासह अन्य अरकाली आणि सुरभी नाटकवल्लू या जाती भारतीय राज्यघटनेच्या कलम १५(४) आणि १६(४) च्या उद्देशाने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत.त्यांना तामिळनाडू शासन आदेश क्रमांक २८ नुसार मागासवर्ग म्हणून ओळखला जाणारा समुदाय आणि सर्वाधिक मागासवर्गीय कल्याण ‘दिनांक १९ जुलै १९९४ नुसार पुर्नजातीचा दाखला मिळावा अशी या वंचित नागरिकांची मागणी असल्याचे भरणे यांच्यापुढे स्पष्ट केले.

      यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा प्रश्न समजून घेतला व याप्रश्नी दुसऱ्या राज्यात स्थित मूळ महाराष्ट्रवासीयांची समस्या आपण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या पुढे मांडून यावर तातडीने उपाय काढून या नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले.यावेळी त्यांनी तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्नेहभावपूर्ण संबंध असल्याचे सांगितले.

चौकट:- 

          या अगोदर चालू असलेली कम्युनिटी सर्टिफिकेटची सुविधा तामिळनाडू राज्यातील प्रशासनाने बंद केल्याने तेथील गलाई व इतर अन्य व्यवसायिकांसाठी सामाजिक व शैक्षणिक सोयीसुविधा घेण्यास अनेक विध्यार्थी – पालकांना नाहक त्रास होत असून यासंदर्भात महाराष्ट्र शासनामार्फत या लोकांना दिलासा देण्याविषयी आम्ही मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. त्यांनी प्रश्नांची दखल घेऊन हा विषय मार्गी लावण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे.  केंद्राकडेही हा प्रश्न नेण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील खासदारांनाही भेटणार आहोत. – रमेशशेठ सपकाळ, अध्यक्ष ,उत्तमराव सपकाळ फाउंडेशन,

Views: 1,120
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
१३ फेब्रुवारी @जागतिक लग्न दिवस

१३ फेब्रुवारी @जागतिक लग्न दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)