• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

देशाच्या पंतप्रधानांना जिहे कठापुरच्या पाणीपुजनास आणणार:आ.जयकुमार गोरे

माणगंगा by माणगंगा
February 18, 2022
in सातारा जिल्हा
0
देशाच्या पंतप्रधानांना जिहे कठापुरच्या पाणीपुजनास आणणार:आ.जयकुमार गोरे

देशाच्या पंतप्रधानांना जिहे कठापुरच्या पाणीपुजनास आणणार:आ.जयकुमार गोरे

दिवडच्या सभेत आ.गोरेंची राष्ट्रवादीविरोधात तुफानी बँटिंग

दहिवडी:
प्रतिनिधी:-(धिरेनकुमार भोसले)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माण खटावचे भूमिपुत्र आ. जयकुमार गोरेंची पाणीप्रश्न आणि भागाच्या विकासाबाबत असणारी तळमळ तन्मयतेने ऐकली.आ. गोरेंनी अगदी मुद्देसूद मांडणी केली आणि पंतप्रधानांनी सकारात्मकता दाखवली

.त्यांनी माण खटावच्या दौऱ्याचे निमंत्रण स्वीकारले.मी माण खटावचे प्रश्न देशपातळीवर मांडतोय.लवकरच इथल्या रेल्वे सर्वेक्षणाचा प्रश्न मार्गी लागतोय.इथली एमआयडीसी आम्ही दोघे कुणालाही पळवू देणार नाही,जया भाऊंच्या विरोधात कारस्थाने करणाऱ्या आणि सवतीची जिरवण्यासाठी नवऱ्याला मारणाऱ्या प्रवृत्ती हद्दपार करा,असे आवाहन खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.दिवड येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण आणि भाजपच्या नूतन सभापती आणि पदाधिकारी यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

यावेळी आ. जयकुमार गोरे,जेष्ठ नेते अर्जुनतात्या काळे,जि.प.सदस्य अरुण गोरे,बाजार समिती सभापती विलासराव देशमुख, पं.स.सभापती रंजना जगदाळे,सरपंच जाकीर सय्यद,उपसरपंच किरण सावंत, डॉ.मासाळ,अकिल काझी,विष्णुपंत कट्टे,गुलाबराव कट्टे,दिगंबर राजगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमात बोलताना आ.गोरे म्हणाले की,माझ्या मतदार संघातील पाण्याचा थेंब मी कुणाला आजपर्यंत पळवू दिला नाही.इथली एमआयडीसी मंजूर करायला आम्ही प्रयत्न केलेत.त्यामुळे पळवापळवीची भाषा कुणी करू नये.आमचा मतदारसंघात माण खटावच्या या दुष्काळी भागात रेल्वे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.मला पाणी आणायची, विकासकामे करायची मस्ती आहे.आता विरोधकांची पोकळ मस्ती जिरवण्यासाठी अजेंडा राबवणार आहे.मी मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी तीन ओळींचा संकल्प घेऊन राजकारणात आलो होतो.

तो संकल्प पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटलो.माझ्या अगोदर या तालुक्याने चुकीचे पुढारी पोसले होते.जनतेने माझ्या विरोधकांना दूध पाजले परंतु त्यांनी कायमच विष ओकले.पाण्याच्या टँकरची मागणी करणारी जनता आता ऊसतोडणीसाठी टोळीची मागणी करताना दिसत आहे, ही मी केलेल्या कामांची पोहोचपावती आहे.उरमोडीचे पाणी शेतीच्या बांधापर्यंत येण्यासाठी १४३ कोटींची काम सुरु आहेत.जिहे-कठापूरच पाणी आणून पुन्हा एकदा फेटा बांधायची वेळ आलेली आहे.पवारांनी सांगितले की,जयकुमारला अडवायला वेळोवेळी फौज येते,त्यांना प्रत्येकवेळी पाणी पाजलय.यापुढे कुणाच्यात किती हिंमत आहे तेच बघणार आहे.

वाळूवाल्यांनी जरा सबुरीने घ्यावे,अन्यथा त्यांच्याकडेही बघावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.कार्यक्रमात नूतन सभापती आणि तालुकाभर चर्चा झालेल्या दिवडच्या सरपंचाचा सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.अँड.हांगे,सदाशिव सावंत,यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक सयाजी लोखंडे यांनी केले.


कार्यक्रमाला वसंत भोसले,महादेव सावंत,रामचंद्र सावंत,विजय कुलकर्णी,आनंदराव वाघमोडे,विठ्ठलराव भोसले,शिवाजी काटकर,सतीश घुटूकडे,नामदेव सावंत,श्रीराम भोसले,बापू काटकर,आप्पासाहेब सावंत,त्यात्यासाहेब माने,महेश गुरव,धनाजी सावकार,किरण लोखंडे,गावोगावचे सरपंच,चेअरमन, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट:- माझ्याकडे जनतेचे मिसाईल


बारामती,फलटण,कराड, साताऱ्याहून माझ्यावर मिसाईलचा मारा राष्ट्रवादीकडून केला जातो.पण माझ्याकडे त्यांच्या सगळ्या मिसाईलला पुरून उरणारे,माझ्यावर विश्वास असणाऱ्या जनतेचे हुकुमी मिसाईल आहे.”माणच्या गोरेंनी मला माढ्यातून हाकलून माझी अब्रु घालवली.काहीही करुन सगळे एकत्र या आणि त्यांना पाडा”असा आदेश पवारांनी सिल्व्हर वोकवर झालेल्या बैठकीत दिला होता.

मतदारसंघातील २२नेते कोट्यावधी रुपयांना विकत घेण्यात आले होते.पवारांचा आदेश आणि मिळालेली फौज घेऊन सगळे माझ्याविरोधात लढले.पैशाचा सूर आणि जातीपातीचे राजकारण केले.पण जयकुमारने त्यांना हिसका दाखवला.मला पाडायची त्यांना तेव्हाच संधी होती,ती हुकल्याने त्यांनी आता पुढील १५ वर्ष आमदारकीची स्वप्ने बघूच नयेत.असा टोला आ. गोरेंनी राष्ट्रवादीला लगावला.

Views: 314
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
मायणीत यावर्षी होणार जल्लोषी शिवजयंतीविविध संस्थांकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन

मायणीत यावर्षी होणार जल्लोषी शिवजयंती
विविध संस्थांकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)