मायणीत यावर्षी होणार जल्लोषी शिवजयंती
विविध संस्थांकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन
मायणी:- दत्ता कोळी
उद्या १९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. शासनाने कोरोना निर्बंधाना शिथिल करीत काही अटीवर शिवजयंती साजरी करण्याची परवानगी दिली आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे हिरमुसलेले मावळे यंदाची शिवजयंती जल्लोषात साजरी करण्याच्या तयारीला लागले आहेत. मायणी याठिकानीही विविध संस्थांकडून शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सुरेंद्र दादा युथ क्लब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मायणी च्या वतीने किल्ले पन्हाळा याठिकानाहून चांदणी चौक मायणी याठिकाणी शिवज्योत आणण्यात येणार असून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच फुलेनगर ,मायणी याठिकाणी माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती निम्मित विविध ठिकाणी नूतन निवडी झालेल्या मान्यवरांचा सन्मान व विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती मायणी ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे.
याचबरोबर मायणी मेडिकल कॉलेजच्या वतीने याठिकाणी छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन व कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा व पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती मायणी मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम.आर.देशमुख यांनी दिली.
तसेच मायणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याठिकाणी महा ई सेवा केंद्र व आपले सरकार या ऑनलाईन सुविधा देणाऱ्या संजय क्षीरसागर,प्रवीण जाधव ,प्रदीप जाधव, मनोज कुंभार या समूहाकडून ई श्रम कार्ड मोफत नोंदणी ,आयुष्यमान भारत रजिस्टेशन नोंदणी, प्रधानमंत्री किसान मानधन योजना ई केवायसी नोंदणी, आधार नाव , जन्मतारीख , पत्ता , मोबाईल लिंक करणे सुविधा,सर्व शासकीय दाखले-उदाहरणार्थ उत्पन्नाचा दाखला , अल्पभूधारक दाखला जातीचा दाखला , नॅशनॅलिटी डोमासाईल , नॉन क्रिमिलियर दाखला , ईडब्ल्यूएस दाखला व इतर सर्व दाखले नोंदणी ,पॅन कार्ड नोंदणी आधार मोबाईल लिंक नसेल किंवा जन्मतारीख पूर्ण नसेल तरी अर्जंट एक दिवसात पॅन कार्ड नोंदणी,उद्योग उद्यम आधार रजिस्ट्रेशन नोंदणी,शॉप अॅक्ट लायसन नोंदणी, कोरोना व्हॅक्सिनेशन सुविधा, सर्व गावातील डिजिटल सातबारा , खाते उतारे , सिटी सर्वे उतारा मिळतील एचपी गॅस कनेक्शन नवीन बुकिंग व गॅस वितरण या सर्व सुविधा काही मोफत तर काही अल्प खर्चाच्या दरात एका ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर याच ठिकाणी “भव्य रक्तदान शिबिरही” आयोजित करण्यात आल्याची माहिती देऊन या सर्व सुविधांचा लाभ या शिवजयंतीच्या निमित्ताने नागरिकांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
याचबरोबर ब्लॉसम इंग्लिश स्कुल याठिकाणी शिवज्योत आणण्यात येणार आहे.
अशा प्रकारे मायणी याठिकाणी शिवजयंती निम्मित विविध कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले असून शिवप्रेमी, मावळ्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.







