जैन समाज संघटनेचा उपक्रम स्तुत्यपूर्ण- प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी
पांगरी : जैन मुनी निवास पांगरी व संत घाडगे महाराज मिशनचे श्री. बिरोबा विद्यालय पांगरी ता.माण येथे माण- खटावचे उप-विभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते जैन मुनी निवासस्थान बांधकाम व शालेय वर्ग खोली बांधकाम भूमि पूजन सोहळा संपन्न झाला. या भूमिपूजन सोहळ्यासाठी भारतीय जैन संघटना व सनमती सेवा दल तसेच हरित वसुंधरा माण- खटावचे प्रतिनिधी व सदस्य उपस्थित होते . या सोहळ्याचा शुभारंभ प्रांतअधिकारी व भारतीय जैन संघटनेचे मान्यवर यांच्या हस्ते शालेय परिसरामध्ये वृक्षारोपण करुन करण्यात आला.
या सोहळ्यासाठी सनमती सेवा दलाचे संस्थापक श्री. मीर गांधी व अध्यक्ष मीर कुमार दोशी, महावीर शहा ( श्रीपूर) , जैनेद्र दोशी ( नमन- पंढरपूर) व प्रितम गांधी ( तोंडले ) तसेच सकल जैन समाज बांधव या ठिकाणी मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी या भूमिपूजन शुभारंभ कार्यक्रमामध्ये मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना सांगितले की,जैन समाजाने संघटित होऊन हा स्तुत्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. अशीच सर्व समाजाने एकी ठेवून या एकीच्या सहाय्याने सामाजिक
कार्य करणे काळाची गरज आहे. उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी पर्यावरण संतुलन करणे, तसेच पर्यावरणवादी चळवळ यशस्वीपणे राबविण्यात यावी. लोकांचा या कार्यामध्ये सहभाग वाढवणे अपेक्षित आहे . मी एक नागरीक या नात्याने माझी काय भूमिका असली पाहिजे? या विषयी सांगतीतले तसेच ते पुढे म्हणाले की हरित वसुंधरा माण- खटाव या साठी जैन समाज व सर्वांनी सहकार्य व योगदान दिले पाहिजे. शिखर शिंगणापूरला नविन पर्यटन क्षेत्राची ओळख देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
दरम्यान,जैन मुनी निवासस्थानासाठी सॊ. व श्री. संजय गांधी या परिवाराने एक लाख रुपये देणगी दिली. तसेच भारतीय जैन संघटना व सनमती सेवा दल यांच्या वतीने शालेय आवारात 150 वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे आभार भरतेश गांधी यांनी मानले.
.







