मिलिंद देशमुखे यांची “मुख्य कार्यक्रम आयोजक” पदावर नियुक्ती
मायणी :- दत्ता कोळी
येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गौरीहर देशमुखे यांची अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाच्या वतीने सातारा जिल्हा कोर कमिटी मध्ये मुख्य कार्यक्रम आयोजक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
सामाजिक क्षेत्रात हिरीरीने सहभागी होणारे मायणी भागातील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद देशमुखे यांच्या निवडीबद्दल मायणी अर्बन बँकेचे चेअरमन व जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी त्यांचा पुष्पहार देऊन सत्कार केला व त्यांच्या आगामी कार्यास शुभेच्छा दिल्या.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाच्या माध्यमातून समाजामध्ये मानसिकदृष्ट्या विविध ठिकाणी त्रास देणे, आर्थिक शाररिक होणारे शोषण, मजुरांचे प्रश्न ,लहान मुलांचे शोषण ,उपासमार,अशा अनेक प्रश्नी होणाऱ्या गंभीर प्रसंगी पोलिसांना व शासकीय संस्थांना सहकार्य करणे ,आदी बाबीत लक्ष देऊन अन्यायग्रस्तांना न्याय देणे .अशा स्वरूपात विविध बाबीमध्ये कार्य केले जाते .
सदर निवडीबद्दल उत्तम दादा सपकाळ फाउंडेशनचे अध्यक्ष ,ऑल इंडिया गोल्ड अँड सिल्व्हर असोसिएशनचे संचालक रमेशशेठ सपकाळ ,मानवाधिकार आयोगाचे मुख्य संयोजक महाराष्ट्र राज्य डॉ विश्वदिप आपगे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष राजाराम कचरे, तालुका अध्यक्ष संतोष डांगे यांचेसह जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मिलिंद देशमुखे यांचे अभिनंदन केले आहे.







