संघर्ष सेना फोडणार अन्यायाला वाचा – सचिन भिसे
मायणी :- दत्ता कोळी
समाजातील अनेक प्रलंबित विषयांना वाचा फोडण्यासाठी विस्कळीत झालेल्या युवकवर्गाला संघटित करून सर्वसामान्य जनतेला “संघर्ष सेनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न असून,हा लढा छ.शिवाजी महाराज,शाहू ,फुले,आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन सर्वधर्मसमभाव या भूमिकेतून उभारणार आहे,अशी प्रतिक्रिया संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य च्या स्थापनेच्या निमित्ताने संघर्ष सेनेचे संस्थापक – अध्यक्ष सचिन भिसे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सचिन भिसे पुढे म्हणाले, संघर्षसेना ही कोणत्याही जात, पात, धर्म, न मानता सर्व सामान्य जनतेच्या मूलभूत न्याय, हक्कासाठी, तसेच शैक्षणिक, रोजगार, आरोग्य या विषयी मदत करणारी एक संघटना आहे . या संघटनेच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न, अडीअडचणी सोडवण्याचे काम निश्चितपणे केले जाईल.यासाठी युवक वर्गाने पुढे येत संघर्ष सेनेत सहभागी व्हावे असे आवाहनही भिसे यांनी केले.
या वेळी डॉ . देवेंद्र बारसिंग, नामदेव फाळके, पोपट मोरे, गणेश पाटोळे, राजू सकट, हणमंत घाडगे, नामदेव फाळके, ( फौजी ) ,चंद्रकांत फाळके, रविंद्र खाडे, दस्तगीर डांगे , नितिन जगताप, विठ्ठल तुपे, मान्यवर तसेच कातर खटाव आणि पंचक्रोशीतील संघर्ष सेना सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावचे सुपुत्र निरज उबाळे यांची मुंबई येथे पोलीस दलात पोलीस निरिक्षकपदी निवड झाल्याबद्दल आणि एनकुळ गावचे सुपुत्र विकास तुपे यांनी वकिल पदाला गवसणी घातली याबद्दल दोन्ही सुपुत्रांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
या कार्यक्रमाचे आयोजन कातरखटाव गावचे ग्रामपंचायत सदस्य अर्जून दुबळे, सयाजी दुबळे, अमोल दुबळे, संतोष भिसे यांनी केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रविण इंगोले यांनी केले. चौकट :- ” संघर्ष सेनेच्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून युवक वर्गाने यात सहभागी होऊन संघर्ष सेनेला बळ द्यावे – सचिन भिसे..संस्थापक अध्यक्ष संघर्ष सेना.