विनायक पालसांडे आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित
दहिवडी प्रतिनिधी :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाघमोडेवाडी येथील शिक्षक श्री. विनायक
पालसांडे यांना आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराने वेणूताई चव्हाण सभागृह, कराड येथे सन्मानित करण्यात आले, त्या प्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मा.श्री.धनंजय चोपडे साहेब, इतिहासकार मा.श्री. श्रीमंत कोकाटे विविध तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या लौकिकात वाढ करणाऱ्या या आदर्श, उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षकरत्न श्री.विनायक पालसांडे सरांना विविध पुरस्कार मिळाले आहेत, नुकतेच त्यांना Microsoft Educator Expert हा बॅच मिळाला आहे. सरांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून
अत्यंत कमी वेळात वाघमोडेवाडी शाळेचे त्यांनी रूपडे पालटले आहे.
विनायक सरांनी विविध उपक्रम राबवत शाळेच्या लौकिकात भर घातली, त्याला शाळा व्यवस्थापन समितीने ही अत्यंत सुंदर अशी साथ दिलेली आहे .
त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती वाघमोडेवाडी यांनासुद्धा आदर्श समिती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
फोटो ओळी :पुरस्कार वितरण प्रसंगी शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे श्रीमंत कोकाटे व इतर गटशिक्षणाधिकारी







