पर्यावरण उत्कर्ष संस्थेकडून निसर्गमित्रांचा झालेला सन्मान संवर्धन कामात प्रोत्साहन देईल – बाळासाहेब कांबळे
मायणी :- प्रतिनिधी
मायणी पक्षी आश्रयस्थानाच्या संवर्धन कामात अग्रेसर असणाऱ्या व वन्यजीव ,पक्षी यांना जीवदान देणाऱ्या युवकांचा पर्यावरण उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था, भारत या संस्थेकडून जिल्हास्तरीय प्रशस्तीपत्र देऊन झालेला सन्मान हा त्यांना निसर्गसवर्धन कामात प्रोत्साहन देणारा ठरणार आहे. मायणी व परिसरातील सामाजिक संस्थाना वनविभागाने बळ देऊन पर्यावरण वाचवण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या कार्यास पुढे नेण्यास मदत करावी ,असे मत मायणी येथील लेखक ,निसर्गप्रेमी बाळासाहेब कांबळे यांनी व्यक्त केले.

ते पर्यावरण उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था यांचे कडून वनविभागाच्या सहकार्याने मायणी येथील पर्यावरण प्रेमी नागरिक, पक्षी मित्र,सर्पमित्र यांना जिल्हास्तरीय प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते.
या कार्यक्रमास वनविभागाच्या वनरक्षक संजीवनी खाडे,वनरक्षक कुंडलिक मुंडे , पर्यावरणप्रेमी तानाजी लिपारे, पक्षीतज्ञ अंकुश चव्हाण, जेष्ठ नागरिक रामभाऊ सोमदे ,सायकलपट्टू शिवाजी कणसे,पर्यावरण उत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश भोंगाळे , प्रसिद्धीप्रमुख स्वप्निल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोंगाळे म्हणाले ,मायणी हे खटाव तालुक्यातील ऐतिहासिक व नैसर्गिक ठेवा असलेले ठिकाण असून याठिकाणाचे पर्यटकांना ,पक्षीप्रेमीना मोठे आकर्षण आहे .या तलाव परिसराचे सौंदर्य वाढविण्यासाठी मायणीच्या अनेक सामाजिक संघटना व त्यांचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत .यातूनच गेल्या दोन वर्षांपासून श्रमदानातून या परिसराची स्वच्छता करण्यासाठी अनेक तरुण धडपडत आहेत. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी खारीचा वाटा उचलून वनविभागाला सहकार्य करणारे,तसेच विविध प्राणी ,पक्षी यांना जीवदान देण्याचे काम करणारे अनेक तरुण सामाजिक जाणीव जपत आहेत .अचानक वणवा लागल्यानंतर तेथे जाऊन वणवा विझवण्यासाठी सहकार्य करणारे विनायक दुर्गामाता ग्रुप ,जगदंब दुर्गामाता ग्रुप ,फ्रेंड्स ग्रुप , राज बहुउद्देशीय संस्था ,भूमाता ब्रिगेड,शिवतेज मंडळ,पत्रकार संघटना,मानवाधिकार संघटना अशा संस्थेचा व प्राण्यांना पक्षांना जीवदान देणाऱ्यां युवकांना गौरव आम्ही संस्थेच्या माध्यमातून करून त्यांच्या कामाला प्रोहोत्साहन देत आहोत.

सदर वेळी पक्षीतज्ञ तानाजी लिपारे,अंकुश चव्हाण, बाळासाहेब कांबळे, श्रीकांत सुरमुख, सुधीर लोहार ,चंदन वरुडे यांनीही मनोगते व्यक्त केले. .कार्यक्रमास दाऊद मुलाणी,मिलिंद देशमुखे, चंदन वरुडे, शिवाजी कणसे, अमोल भिसे,डॉ .सुशांत कोळी,दीपक तारळेकर ,विशाल चव्हाण यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्ता कोळी यांनी केले तर स्वप्नील कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फोटो ओळी
संस्थेच्या माध्यमातून प्रशस्तीपत्र देऊन पर्यावरण संरक्षण करणाऱ्या तरुणांचा सन्मान करताना जिल्हाध्यक्ष प्रकाश भोंगाळे,वनरक्षक संजीवनी खाडे,मुंडे ,बाळासाहेब कांबळे,तानाजी लिपारे यांचेसह इतर मान्यवर (छाया:- श्रीकांत सुरमुख)







