वरकुटे मलवडी विकास सेवा सोसायटी साठी१३ जागेसाठी ३५ अर्ज दाखल…
माण तालुक्यांतील राजकीय दृष्टा सक्षम असलेले गाव म्हणुन जे प्रचलित आहे असे वरकुटे मलवडी गावातील विकास सेवा सोसायटी निवडणुक लागली असुन तब्बल १३ जागेसाठी ३५ उमेदवार रिंगणात उभे आहेत,गावातील राजकीय नेते मंडळीना सोसायटी बिनविरोध करायची ठरवली असताना सुध्दा त्यांना सोसायटी बिनविरोध करता अली नाही कारण बिनविरोध करताना आमदार गोरे गट,जिल्हा मध्यवर्ती उपाध्यक्ष देसाई गट,राष्ट्रवादी अभय जगताप गट,याच्या मध्ये समझोता झाला होता
परंतु याच गावामध्ये रासप गटाचे नेतृत्व मा प्रा सचिन होनमाने सर,तर शेखरभाऊ गटाचे नेतृत्व अजित बनगर हे करत असुन अन्य काही राजकीय मित्र पक्ष यांना विचारत न घेता ही सोसायटी निवडणुक बिनविरोध करण्यात आली होता त्यामुळे रासप नेते प्रा होनमाने सर ,शेखरभाऊ गोरे समर्थक अजित बनगर व मित्र पक्ष नाराज मंडळी यांनी एकत्र येवुन स्वाभिमानी विकास अघाडी स्थापन करुन काल १३ उमेदवारी अर्ज दाखल केले त्यामुळे सोसायटी बिनविरोध होण अवघड झाले तसेच काही अपक्ष ही त्यामध्ये अर्ज दाखल आहेत त्यामुळे लढत रंगतदार होणार असुन धन शक्ती विरोध जनशक्ती अशी लढत पहावयास मिळत असुन यामध्ये आमदार गटाचे नेतृत्व रामभाऊ नरळे,आनंद खरात हे करतायेत तर देसाई गटाचे नेतृत्व स्वता देसाई,सरपंच बाळासाहेब जगताप हे करत आहेत
तर राष्ट्रवादी गटाचे नेतृत्व अभय जगताप,विजय जगताप करताय तर स्वाभिमानी विकास अघाडी चे नेतृत्व मा प्रा सचिन होनमाने सर,अजित बनगर व मित्र परिवार करत आहेत त्यामुळे जनता कुनाला कौल देणार हे येत्या काळात ठरणार असुन रंगत मात्र जोरदार होणार आहे कारण सर्व नेते मंडळी विरोध स्वाभिमानी गट अस चित्र तयार झाल असुन जनता नेते मंडळीना का मा प्रा होनमाने सर यांना कौल देतेय का हे पाहण गरजेचे आहे







