• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

जप्त केलेली वाहने दांडात्मक रक्कम वसुल न करता दिली सोडून…

माणगंगा by माणगंगा
May 11, 2022
in सातारा जिल्हा
0
जप्त केलेली वाहने दांडात्मक रक्कम वसुल न करता दिली सोडून…

जप्त केलेली वाहने दांडात्मक रक्कम वसुल न करता दिली सोडून…

तहसीलदार जमदाडे यांच्यावर गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करण्याची मागणी


दहिवडी प्रतिनिधी : जयराम शिंदे

फलटण ते म्हासुर्णे या राज्य महामार्गाचे काम करणारी राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची अवैध मुरूम व दगड उत्खनन प्रकरणी दंडात्मक कारवाई करून वाहतूक करणारी यंत्रसामग्री जप्त करण्यात आली होती. परंतु खटाव तालुक्याचे तहसीलदार यांनी दंडात्मक रक्कम वसूल न करता कंपनीशी अर्थपूर्ण संबंध ठेवत बेकायदेशीर वाहने तहसीलदार या पदाचा दुरुपयोग करून सोडून दिल्याने सदर प्रकरणाची चौकशी करून तहसीलदार किरण जमदाडे यांच्यावर महसूल प्रशासनाच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल करून कायमचे सेवेतून निलंबित करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा दिनांक २०/०५/ २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी दहिवडी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे आर. आर. पाटील लोकविकास प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी आज उपविभागीय अधिकारी कार्यालय दहिवडी येथे निवेदन सादर केले आहे.


सदर निवेदनामध्ये असे म्हटले आहे की गेल्या दोन वर्षापासून फलटण ते मासुरणे या राज्य महामार्गाचे काम राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करत असताना मौजे गोपुज ता. खटाव गट नं.८४६ मधून परवाण्याच्या नावाखाली पर्यावरण विभागाची कोणत्याही प्रकारचे परवानगी नसताना मोठ्या प्रमाणामध्ये भूसुरुंग स्पोट घडवत लाखो ब्रास मुरूम व दगड याचे अवैध उत्खनन केल्याचे लेखी निवेदन व तक्रारी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसीलदार वडूज खटाव यांनी संबंधित कंपनीला अवैध उत्खनन प्रकरणी लेखी आदेश काढत.६,४०४१६०० / -१,५४,८०००० कोटी रुपये दंड व इतर दंड आकारण्यात आला होता. तसेच संबंधित कंपनीची वाहतूक करणारी यंत्रसामग्री दिनांक २५/१/२०२२ रोजी लेखी आदेश काढत नऊ वाहने जप्त करण्यात आली होती. जप्त केलेल्या वाहनांचे नं खालीलप्रमाणे होते.१) mh12 RK 2677 (2) mh 12 nd 1209 ( 3)mh 12 sx 1163 (4)mh12 qw 9817 (5)mh12 9814 (6) mh12 fs 6257(7) mh12sf 6837 (8)mh12sf 6826 (9)mh12 sk 0881
ही वाहने जप्त करून औंध पोलीस स्टेशन येथे जमा करून प्लांट सील करून कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.

परंतु संबंधित तहसीलदार किरण जमदाडे यांनी तहसीलदार या पदाचा दुरुपयोग करत कंपनीशी अर्थपूर्ण संबंध ठेवत महसूल प्रशासनाची करून दंडात्मक रक्कम वसूल न करता सदर कंपनीची वाहने सोडून दिली असल्याने साप प्रकार गंभीर व बेकायदेशीर व महसूल प्रशासनाची फसवणूक केली जात असल्याने तात्काळ चौकशी करून किरण जमदाडे व इतर महसूल अधिकार्‍यांसह संबंधित कंपनीवर महसूल प्रशासनाच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल करून महसूल अधिकाऱ्यांना कायमचे सेवेतून निलंबित करून कंपनीकडून दंडात्मक रक्कम वसूल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा दिनांक 20/5/ 2022 रोजी उपविभागीय अधिकारी दहिवडी मान यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा आर आर पाटील लोकविकास प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी दिला आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल न झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार महसूल प्रशासन राहील तरी प्रशासनाने या निवेदनाची वेळीच दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी…

छायाचित्र…………..
आमरण उपोषणाचे निवेदन देताना दादासाहेब चव्हाण..

Views: 316
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
नगर विकास मंत्र्यांनी आटपाडी नगरपालिके बाबतचा अन्याय दूर करावा –भारततात्या पाटील

नगर विकास मंत्र्यांनी आटपाडी नगरपालिके बाबतचा अन्याय दूर करावा --भारततात्या पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)