कोल्हापूर दि . २३ ( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल)
जोतिबा मंदिराच्या आवारात शुक्रवारी ( दि .२७ )एक टन वजनाची पंचधातूची महाघंटा बसणार आहे
. पलूस-बुरली (जि. सांगली) येथील भाविक सर्जेराव हिंदुराव नलवडे हे स्वखर्चाने बनवलेली ही महाघंटा ‘श्री’ चरणी अर्पण करणार आहेत. घंटेची उंची पावणेचार फूट असून, यासाठी पंचधातू वापरला आहे. या घंटेचा ३६० अंश कोनात लंबक तयार केला आहे.
श्री. नलवडे जोतिबा देवाचे निस्सीम भक्त असून दर रविवारी व पौर्णिमेदिवशी डोंगरावर येतात. २००० मध्ये त्यांनी यापूर्वीची महाघंटा बसविली होती. गेल्यावर्षी ही घंटा तडे गेल्याने खराब झाली होती. श्री. नलवडे यांना हे समजताच त्यांनी नवीन घंटा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पलूस येथील केदार मेटल फौंड्रीत या महाघंटेचे काम सुरू आहे. शुक्रवारी दि. २७ रोजी महाप्रसाद आणि विधीवत कार्यक्रमात महाघंटेची प्रतिष्ठापना होणार आहे . जोतिबा मंदिरातील दत्त मंदिराच्या पाठीमागील बाजुस असणाऱ्या घंटाघरा मध्ये ही महाघंटा बसवली जाणार आहे . श्री . जोतिबा मंदिरातील महाघंटा ही दररोज पहाटे ४ वाजता मंदिराचे दरवाजे उघडताना वाजवली जाते . मंदिरात महाप्रसाद , कित्णोत्सव , पालखी सोहळा वेळी या महा घंटेचा नाद होतो .