नेदरलँड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघात माणदेशी चॅम्पियन अश्विनी कोळेकर ची निवड
म्हसवड:
आयर्लंड मधील डब्लिन येथे अंडर २३ या गटात होणाऱ्या पाच राष्ट्राच्या क्रिडा स्पर्धेसाठी भारतीय ज्युनिअर महिला हॉकी संघात येथील “माण देशी फाउंडेशन” संचलित “माण देशी चॅम्पियन्स”ची खेळाडू अश्विनी कोळेकर हीची बचावपटु म्हणून निवड
भारतीय हॉकी संघाने जाहिर केली असल्याची माहिती माण देशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय ज्युनिअर महिला हॉकी संघ नेदरलँड,आयर्लंड यूएसए आणि युक्रेन यांच्या विरुद्ध खेळणार आहे. हि क्रिडा स्पर्धा 19 जून ते 26 जून या दरम्यान नेदरलँड येथे संपन्न होणार आहेत.
कर्णदार वैष्णवी विठ्ठल फाळके उपकर्णदार मुंगुंग खान असलेल्या या भारतीय वीस खेळाडूंच्या या संघात संघ गोल रक्षक म्हणून खुशबू,कुर्मपू राम्या.
तर बचावपट्टू प्रीती,ममिता ओरम,महिमा टेटे, नीलम, हृतिका सिंग तसेच मिडफिल्डर्स मंजू चोरसिया, ज्योती छत्री,हिना बानो, निकिता टोप्पो,अश्विनी कोळेकर,रुताजा दादासो पिसाळ.
फॉरवर्ड्स: अन्नू, ब्यूटी मुंगुंग, दीपिका सोरेंग,मोनिका दिपी टोप्पो,मुदुगुला भवानी या खेळाडूंचा समावेश असल्याचे श्री प्रभात सिन्हा यांनी सांगितले.







