कापुसवाडी ता.माण येथील संजय शिवाजी गोरड वय ३५ हे भोजलिंग डोंगरावर शेळ्या राखत असताना,साडे पाचच्या सुमारास अंगावर विज पडून जागीच ठार झाला. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की संजय गोरड हे मेंढपाळ असून दररोज भोजलिंग परिसरातील डोंगराच्या आसपास दहा ते बारा शेळ्या घेऊन चारायला जात असत.
आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानकच वादळवारे विजांचा कडकडाट सुरू झाला.यावेळी वादळी वाऱ्यासह पावसात आकाशातून अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे
या विदारक घटनेने कापुसवाडी गावा वरती शोककळा पसरली असून,चालता बोलता संजय गोरड यांच्या झालेल्या आकस्मिक मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे…..







