• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

टेंभुच्या पाणी योजनातुन सर्वच क्षेत्र ओलीताखाली येणार, पुढील काळात देशमुखांच्या नेतृत्वाखाली माण – खटावचे प्रश्न मार्गी लावणार – उपमुख्यमंत्री अजित पवार |

माणगंगा by माणगंगा
June 12, 2022
in सातारा जिल्हा
0
टेंभुच्या पाणी योजनातुन सर्वच  क्षेत्र ओलीताखाली येणार, पुढील काळात देशमुखांच्या नेतृत्वाखाली माण – खटावचे प्रश्न मार्गी लावणार – उपमुख्यमंत्री अजित पवार |

टेंभुच्या पाणी योजनातुन हजारो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार,
आगामी काळात देशमुखांच्या नेतृत्वाखाली माण – खटावचे प्रश्न मार्गी लावणार – उपमुख्यमंत्री अजित पवार |

म्हसवड

देशातील शेतकर्यांचे लाडके नेते असलेल्या शरद पवार यांची नेहमीच माण – खटावच्या जनतेने पाठराखण केली आहे, त्यामुळे येथील जनतेशी आमचे जिव्हाळ्याचे नाते असुन हेच नाते अधिक दृड करण्यासाठी माण – खटावच्या हजारो हेक्टर क्षेत्रात हरितक्रांती घडवण्यासाठीच महाविकास आघाडीच्या माध्यमातुन टेंभु योजनेतुन अडीच टि.एम.सी. पाणी देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला असुन अर्थसंकल्पीय वर्ष संपण्यापुर्वी हे पाणी माण – खटावच्या शिवारात फिरताना दिसेल तर उर्वरीत माणच्या सर्व गावांनाही पाणी देण्यासाठी सर्वेक्षणाचे काम जलद गतीने सुरु आहे फक्त राष्ट्रवादी पक्षच माण – खटावचे प्रश्न मार्गी लावत असुन येथील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रभाकर देशमुख हे सतत मंत्रायलयात हेलपाटे मारताना दिसतात त्यामुळे यापुढे देशमुख सांगतील ते प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील अशी स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.


टेंभु योजनेतुन माण – खटावमधील ५७ गावांचा समावेश केल्याबद्दल वरकुटे – मलवडी येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख, आमदार दिपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, प्रा. कविता म्हेत्रे, सुभाष शिंदे, संदीप मांडवे, अभय जगताप, अनुराधा देशमुख, नंदकुमार मोरे,वडुज नगराध्यक्षा मनिषा काळे दहिवडी नगराध्यक्ष सागर पोळ, बाळासाहेब सावंत, सरपंच बाळासाहेब जगताप आदी मान्यवर उपस्थित होते

. यावेळी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की माण – खटावमध्ये आमच्या विचाराचा लोकप्रतिनिधी नाही तरीही येथील जनता आमची आहे अन या जनतेची गेली अनेक वर्षाची पाण्याची मागणी प्राधान्याने सोडवण्याचे‌ काम राज्यातील आमच्या सरकारने हाती घेतले असुन यासाठी या तालुक्यांना वरदान ठरणार्या टेंभु योजनेचा अतिरिक्त पाण्याचा कोटा वाढवुन ते वाढीव अडीच टि.एम. सी. पाणी या तालुक्याला देण्याचा धाडसी निर्णय आम्ही घेतला आहे त्यासाठी जलसंपदा खात्याला लागेल तेवढा निधी उपलब्ध करुन देण्याचे काम मी उपमुख्यमंत्री या नात्याने करीत असुन यामुळे सध्या या दोन्ही तालुक्यातील ५७ गावांना लाभ होणार असला तरी उर्वरीत गावांनाही याचा लाभ कसा देता येईल यासाठी सर्व्हेक्षणाचे काम जलद गतीने सुरु आहे. टेंभु योजनेबरोबरच उरमोडी, जिहे – कठापुर या योजनांचा लाभही माण – खटावच्या जनतेला देण्याचा आमचा प्रयत्न असुन त्या योजनानांही निधी उपलब्ध करुन दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष हा शब्द देणारा पक्ष नसुन तो वचनपुर्ती करणारा पक्ष आहे येथील लोकप्रतिनिधी आमच्या विचाराचा नसला तरी येथील लोकं आमच्या विचाराची आहेत कोण काय म्हणतय, कोण काय करतय याकडे मी लक्ष देत नाही तर आम्हाला सामान्य जनतेसाठी काय करता येईल याचा आम्ही सतत विचार करत असतो, माण – खटावच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी‌ येथील राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख हे नेहमीच आग्रही राहिले आहेत त्यांनी ‌यापुढे सर्वांना सोबत घेवुन एकत्रीत काम करावे व येथील सर्व कार्यकर्त्यांनीही देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करताना येथील प्रश्न मार्गी लावावेत, प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतुनच माण – खटावच्या भुमीत औद्योगिक प्रकल्प उभारण्यात येणार आहेत त्यासाठी काही उद्योजक येथे गुंतवणुक करण्यास तयार आहे फक्त लोकप्रतिनिधीनी आपल्या भागात जी काही विकासकामे सुरु आहेत त्याच्या आड न येता ठेकेदाराकडून काही चुकीचे होत असेल तर सुधारणा करावी काम थांबवु नये काम थांबले तर त्या कामाची किंमत भविष्यात वाढते हे होऊ नये यासाठी प्रत्येकाने कामे दर्जेदार होण्याकडे लक्ष द्यावे विकास कामात जर कोणी आडवे आले तर त्याच्यावर थेट कारवाई करा असे स्पष्ट आदेश ना. पवार यांनी भरसभेत जिल्हा पोलिस प्रमुखांना दिले.


यावेळी जयंत पाटील म्हणाले, दुष्काळी माण खटाव भागातील जनतेने व नेत्यांनी या भागाला पाणी कधीच मिळणार नाही अशी मानसिकता आजवर करुन घेतली होती.पण राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरदचंद्रजी पवार साहेबांनी दुष्काळी जनतेला पाणी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाने पाणी आरक्षित करुन टेंभूचे पाणी,जिहे कटापूरचे तसेच उरमोडीचे उर्वरित कामांना वित्तविभागाने मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केल्याने येत्या काळात हि सर्व पाणी योजनांची कामे पूर्णत्वास जाऊन जिथे कुसळे उगवत होती तिथे बागायत शेती होणार असल्याचा विश्वास व्यक्त करुन हे स्वप्न थोड्याच दिवसात पूर्ण होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ज्याठिकाणी कोणत्याही योजनेचे पाणी पोहचू शकत नाही त्याठिकाणी पाणी देवून धाडसी निर्णय घेतला आहे. माण खटावच्या शेतीला नवसंजीवनी देण्यासाठी टेंभूचे पाणी महाविकास आघाडी सरकारने आरक्षित करुन अशक्य ते शक्य करुन दाखवले आहे.


यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील यांनी माण – खटावची जनता ही स्वाभिमानी असल्याचे सांगत पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी असुन पवार साहेबांनीच येथील पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन येथील जनतेला दिले होते त्या आश्वासनाची पुर्ती आज होताना दिसत असल्याचे सांगत लवकरच या भुमीत टेंभुचे पाणी खळाळताना दिसणार असुन त्याचे पुजन करण्यासाठी स्वत: पवार साहेब उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

चौकट –
माझ्याकडे राज्याचे अर्थ खाते असल्याने मी वाढप्याच्या भूमिकेत असून पंगतीला जेवन करताना वाढपी ओळखीचा असला तर जेवन जास्त मिळते तसा मी तुमच्या ओळखीचा वाढपी असल्याने माण खटावला जास्त निधी देवून येथील कोणत्याही विकासकामांना निधीची कमतरता भासू देणार नाही.अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली.

दहिवडी वडूज म्हसवड या तिन्ही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे सध्या दुर्भीक्ष असून त्यापैकी वडूज व दहिवडी याठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून पाणी प्रश्न सोडवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, तर म्हसवड शहरासाठी सुधारित पाणी योजनेसाठी ८६ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

फोटो ओळी – वरकुटे – मलवडी येथे आयोजित कृतज्ञता मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार, ‌दुसर्या छायाचित्रात जमलेला विराट जनसमुदाय.

Views: 386
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
आटपाडीत शिक्षक बँक निवडणूकीचा झंजावती प्रचाराचा शुभारंभ

आटपाडीत शिक्षक बँक निवडणूकीचा झंजावती प्रचाराचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)