ग्रामीण भागातील माणदेशी हिरा अभिनेता विजय पाटील यांची चित्रपट क्षेत्रात गरूडझेप
मायणी ता. खटाव गावचे सुपुत्र व कुरुंदवाडी ता.आटपाडी गावचे नातू विविध पुरस्काराने सन्मानित
माणगंगा न्यूज


मायणी ता. खटाव चे सुपुत्र व कुरुंदवाडी ता.आटपाडी गावचे नातू “माणदेशी हिरा’ अभिनेता विजय मच्छिंद्रनाथ पाटील यांनी अनेक मालिकेत व चित्रपटांमध्ये काम करून अनेक पुरस्कार प्रदान केले आहेत. त्यांचे आजोळ आटपाडी तालुक्यातील कुरुंदवाडी गाव असून राजाराम खोत यांचे नातू तर श्रीमती चंदा मच्छिद्रनाथ खोत (दगडे पाटील) यांचे ते सुपुत्र आहेत. विनय पाटील यांच्या कामगिरीमुळे आटपाडी आणि खटाव तालुक्याचे मान उंचावली आहे.


विनय मच्छिंद्रनाथ पाटील हे मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांना मागील चार वर्षांपुर्वी पासून मनोरंजन क्षेत्रात आवड निर्माण झाली व त्यांनी अनेक सीरियलमध्ये काम केले आहे.
गेल्या चार वर्षांमध्ये मालिकांमध्ये छोटी मोठी काम करतअसताना स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये महत्वाची भूमिका केली. त्या नंतर जिगरबाज या सोनी मराठी वाहिनीच्या मालिकेमध्ये मुख्य कलाकार म्हणून भूमिका केले.त्या नंतर सोनी मराठी वाहिनीचीच “तू सौभाग्यवती हो’ ह्या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका केली.. सध्या “माझी माणसं” ही मराठी वाहिनीवर मालिका चालू आहे..


रंगभूमीवर तहान नावाचं प्रायोगिक नाटक चालू आहे.. जे राज्य नाट्य स्पर्धेत ठाणे केंद्रातून प्रथम आले होते..ते नाटक सदानंद देशमुख यांच्या तहान या कादंबरीवर आधारित आहे.. या नाटकाचं रुपांतर आणि दिग्दर्शन म्हणून काम केले आहे.
गेल्या 8 वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात काम करत असून…फुलपाखरू, माझे मन तुझे झाले, पसंत आहे मुलगी, मोलकरीणबाई, लक्ष आशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
आता सध्या सुरू असलेल्या माझी माणसं आणि गाथा नावनाथांची या मालिकांमध्ये सुद्धा काम करत आहे. तसेच त्यानी लिहिलेली, दिग्दर्शन केलेली आणि प्रमुख भूमिका केलेली “मुंतजीर” ही web film नुकतीच “MX Player” या ott प्लॅटफॉर्म वरती आली आहे.



गेल्या 8 वर्षांपासून नाटक करत असून आता पर्यंत बऱ्याच राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट लेखनाची अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
अशा या ग्रामीण भागातील कलाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत .परंतु हसा मानदेशी हिरा कधीही प्रकाशझोतात आला नाही.







