पाणी परिषदेच्या माध्यमातून जनतेच्या पाठींब्यातूनच स्वप्नवत वाटणारी टेंभू योजना सत्यात -वैभव नायकवडी
आटपाडीत होणारी 29 व्या पाणी परिषद क्रतज्ञता सोहळा म्हणून साजरी करूयात -राजेंद्र आण्णा देशमुख
आटपाडीत 26 जुलै रोजी होणाऱ्या पाणी परिषद नियोजनाची बैठक
नागनाथ आण्णा नायकवडी यांचे जन्मशताबधी वर्ष
आटपाडी
पाणी परिषदेच्या माध्यमातून जनतेच्या पाठींब्यातूनच स्वप्नवत वाटणारी टेंभू योजना पूर्णत्वास गेली आहे.चळवळीच्या सातत्याने व जनरेट्याने दुष्काळी भागात पाणी आले असल्याची भावना हुतात्मा समूहाचे अध्यक्ष पाणी संघर्ष चळवळीचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी व्यक्त केली.
तेरा दुष्काळी तालुक्याच्या पाणी संघर्ष चळवळीच्या 29 व्या परिषदेच्या नियोजनाची बैठक आटपाडी येथे गुरुवारी तांबडा मारुती मंदिराच्या सभागृहात पार पडली यावेळी माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख,सांगोलचे आमदार कै.गणपतराव देशमुख यांचे सुपुत्र चंद्रकांत देशमुख, यांच्यासह सांगोला,सोलापूर,माळशिरस, वाळवा आटपाडी तालुक्यातील पाणी संघर्ष चळवळी मध्ये कै डॉ.नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या सोबत पाणी चळवळीमध्ये सहभागी असणारे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी वैभव नायकवडी म्हणाले की सध्या बहुतांश भागात टेंभुचे पाणी पोहचले आहे.पाणी आलेल्या भागाचे सध्या वेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत.तर पाण्यापासून वंचित असलेल्या भागाचे वेगळे प्रश्न आहेत.यामध्ये विजप्रश्न,पाणी पट्टी चा प्रश्न,पाण्याच्या आवर्तनाचा प्रश्न यासाठी चळवळी कायम उदभवणार्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उभारली जाईल.
चळवळीच्या व्यासपीठावरन कधीही राजकारणाची चर्चा केली गेली नाही.पाणी आलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने पाणी संघर्ष चळवळीच्या पाणी परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन वैभव पाटील यांनी केले आहे.
यावेळी राजेंद्र आण्णा देशमुख म्हणाले की,पाणी आले असले तरी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांला पाण्याचे नियोजन त्या पाण्यावर कोणती शेती करावी, कोणती पिके घ्यावीत व घेतलेली पिके कोणत्या बाजारपेठत विक्रीसाठी न्यावीत किंवा बाजारपेठेचा अभ्यास यासाठी आता काम करणे गरजेचे आहे.
आटपाडी तालुका नेहमीच क्रांतिवीर डॉ नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या पाठीमागे राहिला आहे.त्यांनी सुरू केलेले काम यापुढे ही चालूच राहणार असून त्याच ताकतीने आटपाडी तालुका 26 जून च्या पाणी परिषदेमध्ये सहभागी होईल अशी ग्वाही दिली.
याच वेळी राजेंद्र आण्णा देशमुख यांनी होणाऱ्या पाणी
फोटोपरिषदेसाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून संबंधित खात्याच्या मंत्री यांना निमंत्रण देण्याची सूचना मांडली.
यावेळी कोळा ता सांगोला चे जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख म्हणाले की गेल्या दोन वर्षांपूर्वी पूर परिस्थिती मध्ये अतिरिक्त होत असलेले पाणी दुष्काळी भागाला कोणत्याही शेतकऱ्याची मागणी नसताना सोडण्यात आले होते।त्यावेळी कोणतीही पाणीपट्टी किंवा विजेचे बिल मागितले गेले नाही.मात्र आता शेतकरी पाणी मागत असताना पूर्वीची थकबाकी भरल्याशिवाय पाणी देणार नसल्याचे अधिकारी सांगत आहेत.हा दुष्काळी भागातील शेतकरी वर्गावर केलेला अन्याय आहे.यासह टेंभू योजनेच्या विजे बाबत 19:81 चा फॉर्म्युला ठरविण्यात आला होता.त्यानुसार आतापर्यंत 19 टक्के वीज बिल शेतकरी भरणार व 81 टक्के शासन भरणार होते.हा ठरावाची मुदत आता संपुष्टात येणार आहे.त्यामुळे पाणी आले असले तरी नवीन समस्यां निर्माण होऊ लागल्या आहेत.याबाबत पाणी परिषदेमध्ये विचारमंथन करून शासनाकडून या बाबत ठोस निर्णय घेण्यासाठी आवाज उठवला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी चंद्रकांत देशमुख, सी.पी गायकवाड, हरिभाऊ माने,प्रा.विश्वभर बाबर,शिवाजी पाटील यांच्या सह अन्य भाषणे झाली.