मार्डी गावातील तरुण होतकरू, उच्चशिक्षित सामाजिक कार्यकर्ते व शिवधर्म फॉउंडेशन महाराष्ट्र राज्य संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष रविकिरण दिलीप पोळ यांचा वाढदिवस त्यांच्या सर्व सहकार्यांनी मिळून अनोख्या पद्धतीने साजरा केला.
किरण पोळ यांच्या माण तालुक्यातील सहकार्यांनी दहिवडी येथील अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था दहिवडी येथे शाळेला चांगल्या प्रतीची फळे,मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले व श्री.पोळ इथे नसताना त्या मुलांच्या हातून केक कापून वाढदिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा केला. त्या मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य हा प्रत्येक तरुणाला ऊर्जा देणारा होता.
अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था दहिवडी संचलित अस्थिव्यंग मुलांची निवासी शाळा दहिवडी संस्थेचे संचालक मा.श्री.सचिन देवकुळे मुख्याध्यापक श्रीराम गोफणे,जयदत्त देवकाते,संदेश आवटे,मयुर देशमुख,अमर सावंत,प्रतिक पोळ,आबाजी कदम,वैभव सावंत,अंकुश पोळ,सुमित पोळ यांच्यासह सर्व कर्मचारी व दिव्यांग मुले उपस्थित होते.







