जय भवानी विद्यालयाची स्वतंत्र अमृतमहोत्सवाची अनोखी मोहीम
( विद्यार्थिनींकडून फौजि बांधवाना रक्षाबंधन व हर घर तिरंगा अभियाना सह अनेक उपक्रम)




कै. आबासाहेब पोळ शिक्षण प्रसारक मंडळाच्या जय भवानी विद्यालय पिंगळी या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियान दिनांक 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 अखेर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रभात फेरी, राष्ट्रगीत व समूहगीत गायन, भाषण स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा रक्षाबंधन (लष्करातील भारतीय जवान व शालेय परिसरातील वृक्षांना शालेय विद्यार्थ्यामार्फत राख्या बांधणे) घोषवाक्याचे बॅनर, सांस्कृतिक कार्यक्रम सेवानिवृत्त भारतीय सैनिकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन इत्यादी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय लष्करातील जवानांना पाठविलेल्या राख्या त्यांना पोहोचले असून भारतीय जवानांनी राख्याचा स्वीकार केला आहे आणि सदर उपक्रमाचे स्वागत, कौतुक आणि आभार मानले आहेत.
वरील उपक्रमाविषयी समाधान संस्था मार्गदर्शक व संचालक डॉ. संदीप (दादा )पोळ यांनी व्यक्त केले आहे. सदर उपक्रम यशस्वी पणे राबविण्यासाठी विद्यालयातील शिक्षक बडवे सर, निकम मॅडम, चव्हाण सर,रा़जेंद्र जाधव यांनी विशेष सहकार्य केले आहे







